Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Illegal sand mining: रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक, टिप्पर केला जप्त

Illegal sand mining: देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Illegal sand mining

देऊळगाव राजा पोलिसांची कारवाई ; 20 लाख 20 हजार रुपयांचा एवज केला जप्त

 देऊळगाव राजा : देऊळगाव मही परिसरातील खडकपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई करत एक टिप्पर जप्त केला असून, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २० लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सध्या महसूल विभाग तसेच विविध शासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असताना नदीपात्रातून अवैध रेती उपसा निर्भयपणे सुरू असल्याचे दिसत होते. २२ नोव्हेंबर रोजी एमएच २८ बीबी ९१७१ क्रमांकाचे   टिप्पर खडकपूर्णा नदीपात्रातून चिखली रोडवरील रोहणा फाटा येथे येत असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला संशय आला. तत्काळ पाठलाग करून पोलिसांनी सदर टिप्पर ताब्यात घेतला. या प्रकरणी आरोपी राजेंद्र विठ्ठल पिटकर, रा. चिखली याच्याविरुद्ध महाराष्ट्र गौण खनिज कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लाख रुपये किमतीचे टिप्पर आणि २ ब्रास रेती (किंमत २० हजार रुपये) असा एकूण २० लाख २० हजार रुपयांचा समावेश आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top