Mahabreaking

[breaking_news]

Illegal sand mining : खडकपूर्णा प्रकल्पालगत जेसीबीने रेतीचे अवैध उत्खनन,दोघांविरुध्द गुन्हा दाखल

Illegal sand mining : खडकपूर्णा जलाशयालगत असलेल्या मेहुणाराजा शिवारातील गट क्रमांक २७४ मध्ये बेकायदेशीररीत्या जेसीबीच्या मदतीने रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर विष्णु तांबे (वय ३७, तहसील कार्यालय मेहुणाराजा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सय्यद आरिफ सय्यद मुबारक आणि मालक सय्यद मुबारक सय्यद मुनिर (रा. देऊळगाव मही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Illegal sand mining

देऊळगाव राजा : खडकपूर्णा जलाशयालगत असलेल्या मेहुणाराजा शिवारातील गट क्रमांक २७४ मध्ये बेकायदेशीररीत्या जेसीबीच्या मदतीने रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबतची फिर्याद ग्राम महसूल अधिकारी ज्ञानेश्वर विष्णु तांबे (वय ३७, तहसील कार्यालय मेहुणाराजा, ता. देऊळगाव राजा) यांनी दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सय्यद आरिफ सय्यद मुबारक आणि मालक सय्यद मुबारक सय्यद मुनिर (रा. देऊळगाव मही) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ३.३२ वाजता खडकपूर्णा जलाशयालगत गट क्रमांक २७४, मेहुणाराजा शिवारात आरोपी JCB मशीन (क्रमांक MH 29 BC 5578) च्या सहाय्याने बेकायदेशीररीत्या रेती चोरी करत असल्याचे आढळून आले. याबाबत लेखी अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रकरणाची नोंद घेऊन कायदेशीर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३३ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनात  पोहेका शरद साळवे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top