Mahabreaking

[breaking_news]

Horrific accident :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आयशरने कंटेनरला मागून धडक दिल्याने चालक ठार

Horrific accident : समृद्धी महामार्गावर नगरहून नागपूरकडे जात असलेल्या आयशर वाहनाने समोरील कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या प्राणांतिक अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक ३४४.४, नागपूर कॉरिडॉरवर घडली.   भागवत महादेव सानप (वय ३३, रा. राणेगाव, ता. शेवगाव, जि. नगर) असे मृतक चालकाचे नाव आहे.

Horrific

 पहाटेच्या प्रवासात काळाचा घाला! समृद्धी महामार्गावर आयशर चालकाचा मृत्यू

फकीरा पठाण 

मलकापूर पांग्रा : समृद्धी महामार्गावर नगरहून नागपूरकडे जात असलेल्या आयशर वाहनाने समोरील कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या प्राणांतिक अपघातात आयशर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी, दि. ३१ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ५ वाजता बीबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चॅनल क्रमांक ३४४.४, नागपूर कॉरिडॉरवर घडली.   भागवत महादेव सानप (वय ३३, रा. राणेगाव, ता. शेवगाव, जि. नगर) असे मृतक चालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर वाहन क्रमांक ओडी १९ यू ६१५७ समृद्धी महामार्गावरून जात होते. दरम्यान, नगरहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहन क्रमांक एमएच १६ सीडी ५२५२ ने समोरील कंटेनरला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की, आयशर चालक भागवत सानप यांचा या अपघातात मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती सीआरओ संभाजीनगर यांनी पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी फोनद्वारे पोलिसांना दिली. माहिती मिळताच मलकापूर टीएबी अंतर्गत वाकी येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राचे एपीआय राहुल पाटील, हेड कॉन्स्टेबल देवेंद्र पायघन तसेच पोलीस कर्मचारी इरफान शेख, आकाश यादव आणि राहुल कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथक घटनास्थळी पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचले.

अपघातानंतर महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने घटनास्थळी तातडीने बॅरिकेडिंग करण्यात आले. क्रेनच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात यश आले.

मृत भागवत सानप यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, सिंदखेड राजा येथे पाठविण्यात आला. घटनास्थळी सिंदखेड राजा पोलीस ठाण्याचे कर्मचारीही उपस्थित होते.

या प्रकरणाची नोंद सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास व आवश्यक कायदेशीर कारवाई करीत आहेत. मलकापूर टीएबी अंतर्गत वाकी येथील समृद्धी महामार्ग उपकेंद्राच्या पोलिसांनी सकाळी साडेसात वाजेपर्यंत प्राथमिक कार्यवाही पूर्ण केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top