Mahabreaking

[breaking_news]

Horrific accident:राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; समोरील वाहनाला कारची धडक, दोघे गंभीर

Horrific accident: राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंभापुर बसथांब्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला पाठीमागून एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

Horrific accident

  रंभापुरजवळ उड्डाणपुलाच्या कामादरम्यान अपघात; कारचा चुराडा, दोघे जखमी

बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत रंभापुर बसथांब्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कामासाठी उभ्या असलेल्या वाहनाला पाठीमागून एका भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी-रंभापुर बसथांब्याजवळ राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी एमएच ३० बीडब्ल्यू ५४७४ क्रमांकाच्या वाहनाद्वारे रस्त्याचे सपाटीकरण सुरू होते. त्याचवेळी अकोल्याकडून मूर्तिजापूरकडे जाणारी एमएच २७ बीई ३८०२ क्रमांकाची कार समोरील वाहनाला पाठीमागून धडकली.

या भीषण धडकेत कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला. अपघातात कारमधील अब्दुल वईद अब्दुल सलीम (वय ३०) आणि इस्माईल भुरागारवे, रा. कारंजा लाड हे दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल महादेवराव पातोंड व नारायणराव शिंदे, तसेच महामार्ग पोलिस पथकातील ज्ञानेश्वर चिकटे, रविंद्र आदलसंडे आणि विशाल वडाळ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलिस करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top