Mahabreaking

[breaking_news]

Historic Buddhist Conference :बाळापूरात बौद्ध धम्म परिषदेचा ऐतिहासिक सोहळा; बुद्ध-विचारांचा शांततेचा संदेश

Historic Buddhist Conference :जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांचे विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने बाळापूर नगरीतील उत्सव मंगल कार्यालयात रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद फुले-आंबेडकर विद्वत सभा, बाळापूर आणि दि बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.

Historic Buddhist Conference

राहुल सोनोने 
वाडेगाव : जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांचे विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने बाळापूर नगरीतील उत्सव मंगल कार्यालयात रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद फुले-आंबेडकर विद्वत सभा, बाळापूर आणि दि बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्ट, बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली.
या धम्म परिषदेला जागतिक कीर्तीचे डॉ. भदंत हर्षबोधी महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या समवेत पूज्य भंते गुणरत्न महाथेरो, भंते धम्मशरण महाथेरो, भंते सुमंगल महाथेरो, भंते श्रीलाभ थेरो आणि भंते स्वरानंद थेरो यांचीही मंगल उपस्थिती होती. उपस्थितांना त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ मिळाला. तसेच भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घडविण्यात आल्याने परिषदेला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.
या धम्म परिषदेचे प्रमुख अतिथी म्हणून फुले-आंबेडकर विद्वत सभेचे विभागीय समन्वयक प्रा. सिद्धार्थ देवदरीकर, महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे तसेच प्रसिद्ध वक्त्या अॅड. वैष्णवी हागोणे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शक विचारांचा लाभ उपस्थित जनतेला झाला.
बाळापूर नगरीत धम्म परिषद यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी फुले-आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष माजी प्राचार्य पंजाबराव भिलंगे, प्रा. दीपक तायडे तसेच दि बुद्धिस्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. प्रशांत उमाळे, संजय उमाळे, देवेंद्र सुरवाडे, युवराज डोंगरे, अॅड. प्रविण अंभोरे, सागर उपर्वट, अशोक तायडे, प्रकाश उमाळे, दादाराव गाडेकर, नाजूक वानखडे यांच्यासह विद्वत सभेचे दिलीप इंगळे, अॅड. प्रकाश वानखडे, प्रा. प्रेमराज डोंगरे, मनोहर इंगळे, राजेंद्र इंगळे, नागसेन अंभोरे, प्रकाश तायडे, जितेंद्र उमाळे, प्रमोद इंगळे आणि जयवर्धन डोंगरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक, बहुसंख्य महिला मंडळे तसेच नवयुवक मंडळांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top