Heatwave wreaks :अकोल्यासह विदर्भात 13 एप्रिलपासून उष्ण्तेचा लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी अकोला शहराचे तापमान 43 अंशावर पोहचले होते. सोमवारीही तापमान 43 अंशावर होते. त्यातच आता हवामान विभागाने 13 ते 17 एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तला आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

उष्णतेची लाट 17 एप्रिलपर्यंत राहणार ; नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन
ज़ाकिर अहमद
अकोला : अकोल्यासह विदर्भात 13 एप्रिलपासून उष्ण्तेचा लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी अकोला शहराचे तापमान 43 अंशावर पोहचले होते. सोमवारीही तापमान 43 अंशावर होते. त्यातच आता हवामान विभागाने 13 ते 17 एप्रिलदरम्यान उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तला आहे. तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अकोला शहरासह विदर्भात एप्रिल महिन्याच्या मध्यातच तापमानात मोठी वाढ झाली आहे. शनिवारपासून पारा 43 अंशावर पोचहला आहे. सोमवारीही कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामान्यांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागला. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून बाजारपेठांमध्येही दुपारच्या सुमारास शुकशुकाट पाहायला मिळत आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक थंड पेये, पाणी आणि सावलीचा आधार घेताना दिसत आहेत.
नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे दि. 13 एप्रिल ते दि. 17 एप्रिल दरम्यान अकोला, तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, उन्हात वाहने शक्यतो चालवू नये, ज्वलनशील पदार्थापासून शक्यतो दूर राहावे, लहान मुले व पाळीव प्राण्यांना गेट बंद असलेल्या वाहनात तसेच पार्क केलेल्या वाहनात ठेवू नयेत, तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा, पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना अनावश्यकपणे उन्हात बाहेर न पडण्याचा तसेच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांनी उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याची सूचना देण्यात आली आहे.

