Mahabreaking

🔴 BREAKING
Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार Speeding Car Crashes :वाडेगाव अकोला मार्गावर भरधाव कारचा अपघात; जखमी चालकाला मध्यरात्री  युवकांनी केली मदत Burglary in Aland Village :आळंद गावात घरफोडी; अज्ञात चोरट्यांनी दीड लाखांचे दागिणे केले लंपास Money Robbed :बँकेत पैसे जमा करायला निघालेल्या शेतकऱ्याचे २० हजार हिसकावले, दुचाकीची तोडफोड Argument over TV remote :टीव्हीच्या रिमोटवरून वाद; एकास लोखंडी रॉडने मारहाण, जिवे मारण्याची धमकी Medical Officers :साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला राज , दोन्ही वैष्णवी वैद्यकीय अधिकारी रुजू BJP Lodges Complaint :आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा; भाजपची साखरखेर्डा पोलिसांत तक्रार

Havildar More :लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याहस्ते हवालदार मोरे यांचा पदकाने गौरव,सवडद ग्रामस्थांनी केला सत्कार

Havildar More : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील रहिवासी संतोष मोरे यांनी सैन्यदलात मोठे शौर्य गाजविल्याबद्दल त्यांचा  २८ मार्च २०२६ रोजी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शौर्य पदक बहाल करून सन्मानित केले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदुर राबविण्यात आले. त्यामध्ये हवालदार मोरे यांनी रात्रभर तोफगोळ्यांचा मारा करीत मिशन यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. आज १ एप्रिल रोजी सवडद ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

Havildar More

साखरखेर्डा : मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे सुपुत्र, सिंदखेडराजा तालुक्यातील सवडद येथील रहिवासी संतोष मोरे यांनी सैन्यदलात मोठे शौर्य गाजविल्याबद्दल त्यांचा  २८ मार्च २०२६ रोजी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी शौर्य पदक बहाल करून सन्मानित केले. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदुर राबविण्यात आले. त्यामध्ये हवालदार मोरे यांनी रात्रभर तोफगोळ्यांचा मारा करीत मिशन यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले. आज १ एप्रिल रोजी सवडद ग्रामस्थांनी त्यांचा यथोचित सत्कार केला.

सी.सी.टी.एन.एस. प्रणाली मानांकनात बुलढाणा  जिल्हा पोलीस दल राज्यात अव्वल

ऑपरेशन  सिंदुर राबविताना  दुश्मनांच्या तोफगोळ्याचा स्प्लिंटरचा तुकडा उडून त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. तरीही त्यांनी उपचार न घेता प्रथम देशसेवेसाठी महत्व दिले . मोठ्या साहसाने पाकिस्तानी सैन्याच्या दिशेने तोफगोळे मारले. या शौर्याबद्दल स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी शौर्य पदक जाहीर झाले होते .  ते २८ मार्च रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले .

लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्याहस्ते हवालदार मोरे यांचा पदकाने गौरव करण्यात आला. मोरे हे जम्मू-काश्मिरमधील कुपवाडा (तंगधार) भागात ३४ मराठा मैदानी तोफखाना बटालीयनमध्ये कार्यरत आहेत. सैन्यदलात १२ वर्षांपासून ते देशरक्षणासाठी सेवा देत आहेत. दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला करून निष्पाप नागरिकांचा बळी घेतला. तेव्हापासून देशवासीयांच्या मनामध्ये प्रचंड चिड निर्माण झाली होती. अखेर सैन्यदलाने ऑपरेशन सिंदुर राबवून पहलगाव हल्ल्याचा बदला घेतला. ९ मे २०२५ च्या रात्री दीड वाजता पाकिस्तान आणि पीओकेच्या दिशेने ‘वॉर’ सुरू करण्यात आला. अडीचशे ते तीनशे भारतीय जवानांनी युद्ध छेडले. पाकिस्तानच्या सैन्यानेदेखील तोफगोळे फेकणे सुरू केले. तोफगोळ्याच्या स्प्लिंटरच्या तुकडा हवालदार मोरे यांच्या उजव्या हाताला लागला. यात ते जखमी झाले. मात्र, काही झाले तरी मागे हटायचे नाही, हा निर्धार करीत पहाटे पाच वाजेपर्यंत संतोष मोरे यांनी शत्रूच्या दिशेने तोफगोळ्यांचा मारा सुरुच ठेवला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. शारीरिक कमजोरी आल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले .

या शौर्याबद्दल संतोष मोरे यांना १५ ऑगस्ट २०२५ ला सैन्यदलाने शौर्य पदक जाहीर केले. २८ मार्च २०२६ रोजी एका समारंभात हे पदक बहाल करण्यात आले. यावेळी मोरे यांच्या पत्नी सुजाता मोरे ह्या सुद्धा उपस्थित होत्या  .

लग्नाच्या अकराव्या दिवशीच कर्तव्यावर

बुलढाणा जिल्ह्याचे शूरवीर सुपुत्र हवालदार संतोष मोरे हे आपल्या लग्नाकरिता रजेवर आले होते. लग्नाला जेमतेम अकरा दिवस होत नाही तोच ऑपरेशन सिंदुरसाठी रवाना होण्याचा संदेश धडकला. भारतीय लष्कराच्या आदेशानुसार हजर होऊन मिशनमध्ये त्यांनी आपला पराक्रम दाखवून दिला.   ३१ मार्च रोजी सवडद गावात येताच त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तेजराव देशमुख यांच्या हस्ते संतोष मोरे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला . यावेळी सरपंच गजानन देशमुख , माजी सरपंच रुख्मिणा देशमुख  , रावसाहेब देशमुख , ग्रामपंचायत सदस्य गणेश देशमुख , उपसरपंच केशव मोरे , सुधाकर देशमुख , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शहाजी राजे देशमुख , अजय देशमुख , लक्ष्मण देशमुख , अंबादास देशमुख , अमोल देशमुख , विशाल देशमुख , संतोष देशमुख , शरद देशमुख , पंकज देशमुख , विष्णू मोरे , पवन देशमुख , विशाल गुंजाळकर , हार्दिक शिंदे , भास्करराव मार्के उपस्थित होते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top