Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

‘Constitution 75’ initiative: ‘संविधान ७५’ उपक्रमांतर्गत सहकार विद्यालयात मार्गदर्शन कार्यक्रम 

‘Constitution 75’ initiative: भारताच्या संविधानाला येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत ‘संविधान ७५’ हा विशेष उपक्रम राज्यभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे.

‘Constitution 75’ initiative

देऊळगाव मही : भारताच्या संविधानाला येत्या २९ नोव्हेंबर २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक पर्वानिमित्त अनुगामी लोकराज्य महाअभियान (अनुलोम) या संस्थेमार्फत ‘संविधान ७५’ हा विशेष उपक्रम राज्यभरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आकर्षण निर्माण होणे, त्यांना संविधानाची सखोल माहिती मिळावी आणि नागरिक म्हणून आपल्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव व्हावी, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सहकार विद्या मंदिर, देऊळगाव मही येथे ‘संविधान ७५’ मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सचिन खरात  होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून अनुलोम संस्थेचे बुलढाणा उपविभाग प्रमुख प्रितम वाघमारे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचा उगम, त्याची वैशिष्ट्ये, नागरिकांचे कर्तव्य आणि अधिकार याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुलोम संस्थेचे सिंदखेडराजा भाग जनसेवक अतिश पान्नासे यांनी केले. त्यांनी अनुगामी लोकराज्य महाअभियान संस्थेची ध्येय–धोरणे, तसेच समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे  संचालन केशव तळेकर सर यांनी केले. यावेळी उपमुख्याध्यापक रोहित पर्हाड, पर्यवेक्षक आप्पाराव खेडेकर, पडघान, तसेच शिक्षकवृंद, शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. तसेच अनुलोम मित्र मिलन शेळके, विनोद खिल्लारे, पुंजाराम चेके आदींची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून संविधानाबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top