Mahabreaking

🔴 BREAKING
Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Private Bus Accident;समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला

Rejects No-Confidence Motion :सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिनी गरड यांच्यावर ३० मार्च रोजी उपसरपंचासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. तो पारीतही झाला होता . परंतू  16 एप्रिल रोजी ग्रामसभेत हा अविश्वास ठराव मांडला असता ग्रामसभेने हा ठराव फेटाळला आहे.

Rejects No-Confidence Motion

 सरपंचपदी नलिनी गरड कायम ; ग्रामपंचायत सदस्यांनी पारीत केला होता अविश्वास प्रस्ताव

साखरखेर्डा : सिंदखेडराजा तालुक्यातील खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच नलिनी गरड यांच्यावर ३० मार्च रोजी उपसरपंचासह ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता. तो पारीतही झाला होता . परंतू  16 एप्रिल रोजी ग्रामसभेत हा अविश्वास ठराव मांडला असता ग्रामसभेने हा ठराव फेटाळला आहे.

खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतीच्या सरपंच  नलिनी गरड यांच्यावर ९ सदस्यांनी  नाराजी व्यक्त केली होती. सरपंच कोणतेही निर्णय घेताना सदस्यांना विश्वासात घेत नाही . उलट जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्यामुळे गावाच्या विकास कामांना खिळ बसली आहे, असा आरोप या सदस्यांनी केला होता . याशिवाय प्रशासनात अभाव, विकास कामातील अनियमितता , सदस्यांना असहकार्याचा अभाव , ग्रामपंचायत मधील कारभारात पारदर्शकतेचा अभाव असे आरोप करण्यात आले होते . ३० मार्च रोजी विद्या संजय लहाने , प्रकाश रामभाऊ गरड , नंदा श्रीकृष्ण तळेकर , दत्तू त्र्यंबक तळेकर , अलका सुधाकर नागरे , जनार्दन विक्रम नागरे , मिनाक्षी विनोद म्हस्के , सुनिता सुरेश भालेकर , स्वाती शिवानंद खेडेकर  या ९ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला होता . तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता . परंतू नलिनी गरड ह्या जनतेतून निवडून आलेल्या सरपंच असल्याने तहसीलदार अजित दिवटे यांनी १६ एप्रिल रोजी खैरव बारलिंगा गट ग्रामपंचायतीची ग्रामसभा घेऊन सदर अविश्वास ठराव ग्रामसभेत मांडला . अविश्वास ठरावाच्या बाजूने १५१ मते पडली . तर अविश्वास ठरावाच्या विरोधात १९० मते पडली . त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य यांनी आणलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत फेटाळण्यात आला. सरपंच यांना ३९ मते अधिक मिळाली . सरपंचपदी नलिनी राजेंद्र गरड कायम राहिल्याने उपस्थितांनी गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top