Mahabreaking

[breaking_news]

Government employees strike  :सरकारी कर्मचाऱ्यांचा संप चौथ्या दिवशीही सुरूच; तहसीलची कामे खोळंबली

Government employees strike  : विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपात सिंदखेडराजा तहसिल मधील कर्मचारी सहभागी झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. ११ वी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करताना कागद पत्रांची पुर्तता होत नसल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे .

Government employees strike

सिंदखेड राजा तहसीलमधील चित्र: दाखले मिळणे बंद झाल्याने विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त

अशोक इंगळे

सिंदखेड राजा : विविध मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला आहे. या संपात सिंदखेडराजा तहसिल मधील कर्मचारी सहभागी झाल्याने अनेक कामे रखडली आहेत. ११ वी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करताना कागद पत्रांची पुर्तता होत नसल्याने पालक वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे .

महाराष्ट्रातील सर्व महसूल कर्मचारी 21 एप्रिल पासून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संपावर गेले आहेत . सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी ,या मागणीसह अनेक मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या आहेत . या अगोदर सुध्दा त्यांनी मागणी संदर्भात आंदोलन केले होते . शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. परंतू त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी पुन्हा तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. २० एप्रिल पासून सिंदखेडराजा तालुक्यातील महसूल संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी संपावर गेले आहेत. कामबंद आंदोलन सुरु केल्याने सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वच विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला , नाॅन क्रिमीलेयर , जातीचा दाखला मिळणे दुरापास्त झाले आहे . केंद्रीय शिक्षण प्रणाली नुसार १० मधील विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये प्रवेश अर्ज सादर करण्याची ३० एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे . परंतू कागद पत्रांची जुळवाजुळव करताना अडचणी येत आहेत. तरी शासनाने कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा , आणि महसूल कर्मचाऱ्यांना पुर्ववत कामावर रुजू होण्याचे आदेश द्यावेत .  संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आर.आर .कहाळे , एस. डी. बंगाळे , एस. बी. रोकडे , व्ही. जे. पडघान , के जी इंगोले , श्रीकृष्ण शिंगणे , एस बी अंभोरे यांच्यासह अनेक कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top