Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Mayor Madhuritai Shipne :जाहीरनाम्यानुसार कारभार, विकासात तडजोड नाही : नगराध्यक्ष माधुरीताई शिपणे 

Mayor Madhuritai Shipne : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक काळातील जाहीरनाम्यानुसारच पालिका प्रशासन चालविले जाईल. शहरवासीयांना अपेक्षित असलेला विकास घडवतानाच प्रत्येक नागरिकाला मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठाम संकल्प असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी तुषार शिपणे यांनी दिले. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित भव्य पदग्रहण समारंभात आमदार मनोज कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Madhuri Shipne

देऊळगाव राजा : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणूक काळातील जाहीरनाम्यानुसारच पालिका प्रशासन चालविले जाईल. शहरवासीयांना अपेक्षित असलेला विकास घडवतानाच प्रत्येक नागरिकाला मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा ठाम संकल्प असल्याचे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष माधुरी तुषार शिपणे यांनी दिले. नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित भव्य पदग्रहण समारंभात आमदार मनोज कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

add

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षस्थानी मातृतीर्थ मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे होते. यावेळी विधानपरिषदेचे आमदार वसंत खंडेलावाल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मान्टे, ज्येष्ठ नेते धनशीराम शिपणे, पिरिपाचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम कासारे, राष्ट्रवादीचे नेते सुभाष दराडे, प्रा. दिलीप झोटे, हाजी एम. सिद्दीक, रिपाईचे जिल्हाध्यक्ष दिलीप खरात, भाजप नेते भगवान मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी केले. त्यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पालिकेतील विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा फेटे बांधून यथोचित गौरव करण्यात आला.

add

पदग्रहणानंतर बोलताना नगराध्यक्ष माधुरी शिपणे यांनी शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांनी पक्षभेद विसरून सहकार्य करावे, असे आवाहन केले. “देऊळगाव राजाचा विकास हा सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार मनोज कायंदे यांनीही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची भूमिका स्पष्ट करताना, “राज्य शासनाकडून देऊळगाव राजाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,” असे ठाम आश्वासन दिले. यावेळी ॲड. काझी, डॉ. मान्टे, प्रा. झोटे यांनीही मनोगत व्यक्त करत नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

पहिल्यांदाच अत्यंत नियोजनबद्ध आणि दिमाखदार स्वरूपात झालेल्या या कार्यक्रमामुळे पदग्रहण समारंभाला ‘शाही सोहळ्याचे’ स्वरूप प्राप्त झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी व भाजपा महायुतीचे गटनेते प्रदीप वाघ, शहर विकास आघाडीच्या गटनेत्या रंजना रामाणे, गोविंद झोरे, सचिन आंधळे, विकास कासारे, निलेश गीते, बाबासाहेब कासारे, मोहम्मद अतीक, हाजी नजीर, सय्यद मुर्तीजा यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक व मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सदाशिव मुंडे यांनी तर शहराध्यक्ष सुनील शेजुळकर यांनी आभार मानले.

टीकेला राजकीय प्रत्युत्तर :
पालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांवर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड यांनी स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर दिले. “आम्ही गाडीखाली चालणारे नाही, तर गाडीत बसून विजयश्री खेचून आणणारे आहोत,” असे म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top