Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Fugitive who robbed :चाकुच्या धाकावर वृध्देला लुटणारी फरार बाली गजाआड;दोन आरोपी अद्याप फरारच! 

Fugitive who robbed :हनवतखेड येथे एका ९२ वर्षाच्या वयोवृद्ध आजीला चाकुचा धाक दाखवून दागिने लंपास केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या इंदुबाई  ( बाली ) गजानन महाजन हीला एका शेतातून अटक केली आहे .

Fugitive who robbed

साखरखेर्डा : हनवतखेड येथे एका ९२ वर्षाच्या वयोवृद्ध आजीला चाकुचा धाक दाखवून दागिने लंपास केल्याची घटना २९ जानेवारी रोजी घडली होती. या प्रकरणी तीन महिन्यांपासून फरार असलेल्या इंदुबाई  ( बाली ) गजानन महाजन हीला एका शेतातून अटक केली आहे .

वडगाव तेजन येथील शेतकऱ्याची एक हेक्टर आंब्याची बाग जळून खाक

हनवतखेड येथील सुमन श्रीराम चव्हाण वय.९२ वर्ष ही महिला २९ जानेवारी रोजी घरी असताना अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी घराचे मागील किचन रुमचा दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात आले .  त्यांनी आजी झोपेत असताना तिच्या अंगावरील हातातील कानातील व नाकातील गळयातील दागिने काढले . तेव्हा नाकातील नथ  काढत असताना आजीला जाग आली . आपल्या अंगावरील दागिने लूटल्याचा प्रकार लक्षात आला  , दरम्यान आजीला चोरट्यांनी  चाकूचा धाक दाखवीत सदर  चोरट्यांनी तिचे अंगावरील  सन-२००५-२००६ मधे खरेदी केलेले जुने वापरते सोन्याचे दागिने चोरुन नेले . दोन्ही हातातील सोन्याच्या  पाच तोळयाच्या दोन बांगड्या कि.अं. ३५,०००/- रु. २. गळयातील सोन्याची पोत दोन तोळयाची कि. अं.१४,०००/- रु. ३. कानातील सोन्याचे झुमके (टॉप्स) एक तोळयाचे कि.अं.७०००/-रु. असे एकुन सन-२००५-२००६ मधील बाजार भावाप्रमाणे एकुन किमती ५६,०००/- रु.चे सोन्याचे दागदागीने चोरुन नेले.

नाकातील नथ न निघाल्याने ती नेली नाही तसेच चोरट्यांनी घरातील ३२ इंची टिव्ही व रिसीव्हर घराबाहेर नेऊन ठेवला . आजच्या बाजार भावाप्रमाणे त्या दागिन्यांची किंमत १३ लाख रुपये असून याप्रकरणी अनिल चव्हाण यांनी साखरखेर्डा पोलीसात फिर्याद दाखल केली होती . सदर आरोपी मध्ये हनवतखेड येथील इंदुबाई ( बाली ) गजानन महाजन हि सहभागी असल्याचे धागेदोरे पोलीसांच्या हाती लागले होते. याच वेळी यातील दोन चोरटे मालेगाव कडे पसार झाले.   मालेगाव पोलीस गस्तीवर  असताना त्यांना ते दोघे अट्टल गुन्हेगार आहेत आणि फरार आरोपी आहेत . लागलीच त्यांना ताब्यात घेतले असता मालेगाव पोलीसांनी दोघांची झाडाझडती घेतली.  त्यांचेकडे उपरोक्त मुद्देमाल मिळून आला .  हनवतखेड येथे चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सदर चोरटे साखरखेर्डा पोलीसांनी ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता इंदुबाई देखील यात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. दोन आरोपी अटक करण्यात आल्याचे लक्षात येताच ( बाली ) इंदुबाई फरार झाली. साखरखेर्डा पोलीस तीन महिण्यापासून तिच्या मागावर होते. हनी ट्रॅप करून लोकांना ब्लॅकमेल करणाऱ्या इंदुबाई उर्फ बाली हिला अटक करण्यासाठी हनवतखेड वासियांचा पोलीसांवर दबाव वाढत होता. दरम्यान ती मोहदरी येथे आपल्या माहेरी एका शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  दरम्यान बीट जमादार निवृत्ती पोफळे ,  पो कॉ लक्ष्मण इनामे , पो कॉ राजेश गीते , पोहे कॉ गजानन वाघ , महिला पोलीस कर्मचारी जानकी केवट यांनी सापळा रचून  २४ मार्च रोजी बालीला ताब्यात घेतले . दरम्यान न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . या चोरीतील निलेश दत्ता महाजन, वडप ता. मालेगाव ,  रामेश्वर कोंडूजी हामरे वारा जहागीर ता  . मालेगाव हे दोघे जण फरार असून पोलीस शोध घेत आहेत.     यातील अटक आरोपी करण एकनाथ वंजारे रा. खेर्डा ता. मालेगाव, जि. वाशीम, मनोज मोहन इंगळे रा. सुकंडा ता.मालेगाव, जिल्हा वाशीम, यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेकडून सर्व माल हस्तगत करण्यात आला आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top