Mahabreaking

[breaking_news]

16 corporators suspended :विशेष सभेतील गोंधळानंतर १६ नगरसेवक तीन सभांसाठी निलंबित

16 corporators suspended :महानगरपालिकेच्या विशेष सभेदरम्यान झालेल्या गोंधळ, घोषणाबाजी आणि तीव्र वादानंतर महापौरांनी कठोर भूमिका घेत १६ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित केले आहे. सभागृहातील शिस्त भंग करणे, नियमित कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण करणे आणि कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.

16 corporators suspended

अकोला महापालिकेत राजकीय वातावरण तापले; महापौरांची कठोर कारवाई

जाकीर अहमद 

अकोला : महानगरपालिकेच्या विशेष सभेदरम्यान झालेल्या गोंधळ, घोषणाबाजी आणि तीव्र वादानंतर महापौरांनी कठोर भूमिका घेत १६ नगरसेवकांना पुढील तीन सभांसाठी निलंबित केले आहे. सभागृहातील शिस्त भंग करणे, नियमित कार्यवाहीमध्ये अडथळा निर्माण करणे आणि कामकाज ठप्प करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली.

बोरगाव मंजू परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची उडाली धांदल

मिळालेल्या माहितीनुसार, विशेष सभेत विविध प्रशासकीय व स्थानिक विकासाच्या मुद्द्यांवर काही नगरसेवकांनी तीव्र आक्षेप नोंदवत जोरदार विरोध दर्शविला. यावेळी घोषणाबाजी आणि गोंधळामुळे काही काळासाठी सभेची कार्यवाही पूर्णपणे ठप्प झाली. वाढता तणाव लक्षात घेता सभागृहाची शिस्त, प्रतिष्ठा आणि कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी नियमांनुसार कठोर निर्णय घेणे आवश्यक असल्याचे नमूद करत महापौरांनी निलंबनाची घोषणा केली.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये मोहम्मद फजलू अब्दुल करीम, आझादखान अलियारखान, पराग रामकृष्ण गवई, निलेश रामकृष्ण देव, शेख शमशू कमर शेख साबीर, डॉ. झिशान हुसेन, विजय रामदास इंगळे, शंकर भाऊराव लंगोटे, निलोफरखान सोहेलखान, आकाश श्रीकृष्ण कवडे, अभय अशोक खुमकर, जैनबी शेख इब्राहिम, आसिया परवीन मोहम्मद शारिक, उज्वला प्रविण पातोडे, सुवर्णरेखा विजय जाधव आणि जयश्री महेंद्र बहादुरकर यांचा समावेश आहे.

या निर्णयानंतर अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून समर्थक आणि विरोधकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी सभागृहाची शिस्त राखण्यासाठी हा निर्णय योग्य असल्याचे मत व्यक्त केले, तर विरोधकांनी हा निर्णय लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, आगामी महानगरपालिका सभांमध्ये या निलंबनाच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप, विरोधी भूमिका आणि अधिक आक्रमक राजकारण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला महानगरपालिकेतील पुढील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top