Fire breaks : डोणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मौजे कऱ्हाळवाडी येथील शेतशिवारात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला मध्यरात्री आग लागल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत अंदाजे २० पोती सोयाबीन जळून खाक झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.

कष्टाने पिकवलेले सोयाबीन आगीत खाक; कऱ्हाळवाडीत शेतकरी कुटुंबावर आर्थिक संकट
डोणगाव : डोणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या मौजे कऱ्हाळवाडी येथील शेतशिवारात काढणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याला मध्यरात्री आग लागल्याची धक्कादायक घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली. अज्ञात व्यक्तीने ही आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेत अंदाजे २० पोती सोयाबीन जळून खाक झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. ऐन काढणीच्या हंगामात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे.
चार एकरांतील सोयाबीनचे नुकसान
प्राप्त माहितीनुसार, डोणगाव येथील विष्णू रामभाऊ बाजड आणि विमलबाई गजानन बाजड यांची मौजे कऱ्हाळवाडी येथील सर्व्हे क्रमांक ३७१ मध्ये शेती आहे. या शेतातील अंदाजे चार एकर क्षेत्रातील सोयाबीनची काढणी करून त्याच्या सुड्या अर्थात ढिगारे तयार करून ठेवण्यात आले होते.
दरम्यान, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या सोयाबीनच्या सुड्यांना आग लागली. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत अंदाजे २० पोती सोयाबीन जळून पूर्णपणे खाक झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकवलेल्या सोयाबीनची काढणी केल्यानंतर शेतकऱ्यांना उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, सोयाबीनच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. आधीच शेतीतील वाढता खर्च आणि अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत असताना या घटनेने त्यांच्या आर्थिक संकटात आणखी भर पडली आहे.
पंचनामा; नुकसानभरपाईची मागणी
घटनेनंतर झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन आगीमागील नेमके कारण शोधावे, तसेच अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक आग लावली असल्यास संबंधिताचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व शासनाकडून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे कऱ्हाळवाडी परिसरात चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

