Mahabreaking

[breaking_news]

  health center :आरोग्य केंद्राच्या दारातच घाणीचे साम्राज्य; डोणगावच्या आठवडी बाजारामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

health center : येथील आठवडी बाजार दर आठवड्याला थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर आणि लगतच्या परिसरात भरत असल्याने या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णांना आरोग्यसेवा देणाऱ्या केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच उघड्यावर कचरा, सडलेल्या भाज्या, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच दुर्गंधीयुक्त पाण्याची डबकी साचत असल्याने रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

health center

  ‘आरोग्य मंदिरा’समोरच कचऱ्याचे ढीग; आठवडी बाजाराच्या अस्वच्छतेवर ग्रामस्थ संतप्त

डोणगाव : येथील आठवडी बाजार दर आठवड्याला थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर आणि लगतच्या परिसरात भरत असल्याने या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रुग्णांना आरोग्यसेवा देणाऱ्या केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच उघड्यावर कचरा, सडलेल्या भाज्या, प्लास्टिकच्या पिशव्या तसेच दुर्गंधीयुक्त पाण्याची डबकी साचत असल्याने रुग्ण आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिस्थितीमुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

‘आरोग्य मंदिरा’च्या दारातच अस्वच्छता

डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, याच आरोग्य केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आठवडी बाजारातील विक्रेते गाडे व दुकाने थाटतात. बाजार संपल्यानंतर भाजीपाल्याचा कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर टाकाऊ पदार्थ जागेवरच पडून राहतात. नियमित साफसफाई होत नसल्याने या कचऱ्याचे ढीग साचतात आणि परिसरात दुर्गंधी पसरते.

डास-माशांचा प्रादुर्भाव; साथीच्या आजारांचा धोका

पावसाळा आणि बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना व जनजागृती केली जाते. मात्र, आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरच अस्वच्छता निर्माण होत असल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कचरा आणि साचलेल्या पाण्यामुळे डास व माशांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, आठवडी बाजारात येणारे नागरिक, विक्रेते तसेच आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या परिसराची तातडीने स्वच्छता करून आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

बाजारातून कर वसुली; स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष?

आठवडी बाजारातून ग्रामपंचायतीकडून नियमितपणे कर वसूल केला जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, बाजाराच्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, कचरा संकलन करणे आणि बाजार संपल्यानंतर परिसराची स्वच्छता करणे याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची तक्रार आहे.

आठवडी बाजारासाठी स्वतंत्र व योग्य जागेचे नियोजन करण्याऐवजी आरोग्य केंद्रासारख्या संवेदनशील परिसरात बाजार भरत असल्याने ग्रामपंचायतीच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरील कचरा तातडीने हटवावा, परिसराची नियमित स्वच्छता करावी, साचलेल्या पाण्याचा निचरा करावा आणि आठवडी बाजारासाठी पर्यायी जागेचे नियोजन करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न गांभीर्याने घेऊन ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासन आता तरी तातडीने उपाययोजना करणार का, याकडे डोणगावकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top