Mahabreaking

[breaking_news]

Fatal obsession :सेल्फीचा मोह बेतला जीवावर! बार्शीटाकळीच्या युवकाचा दरीत कोसळून मृत्यू

Fatal obsession : तालुक्यातील धाबा येथील मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरायला गेलेल्या बार्शीटाकळी येथील युवकाचा सेल्फी घेताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष लाडके (वय ४२) असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा मार्गावरील वनविभागाच्या एका पॉईंटजवळ घडली.

Fatal obsession

चिखलदरा फिरायला जाणे ठरले अखेरचे; सेल्फी घेताना दरीत कोसळून संतोष लाडके यांचा मृत्यू

बबन इंगळे

बार्शीटाकळी  : तालुक्यातील धाबा येथील मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरायला गेलेल्या बार्शीटाकळी येथील युवकाचा सेल्फी घेताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष लाडके (वय ४२) असे मृत युवकाचे नाव असून, ही घटना ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-चिखलदरा मार्गावरील वनविभागाच्या एका पॉईंटजवळ घडली.

संतोष लाडके हे धाबा येथील मित्रांसोबत चिखलदरा येथे फिरण्यासाठी जात होते. परतवाडा-चिखलदरा मार्गावरील एका पॉईंटजवळ ते सेल्फी घेत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते सुमारे दहा ते बारा फूट खोल दगडी दरीत कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी तत्काळ दरीत उतरून संतोष लाडके यांना गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी परतवाडा येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी त्यांना अमरावती येथे हलविण्याचा सल्ला दिला. अमरावती येथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

कटलरीच्या दुकानातून चालवत होते कुटुंबाचा उदरनिर्वाह

मृत संतोष लाडके हे धाबा येथील चौकात कटलरी व जनरल स्टोअरचे दुकान चालवत होते. किरकोळ विक्रीच्या व्यवसायातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

काही वर्षांपूर्वी भावानेही केली होती आत्महत्या

दुर्दैवाची बाब म्हणजे संतोष लाडके यांचे लहान भाऊ गोपाल लाडके यांनी काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता संतोष लाडके यांच्या आकस्मिक मृत्यूने त्यांच्या आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.या घटनेची माहिती मिळताच धाबा व बार्शीटाकळी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, लाडके यांच्या मित्रपरिवारावरही शोककळा पसरली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top