Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Farmers’ digital friend : शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र : ‘महाविस्तार – AI’

Farmers’ digital friend : महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘महाविस्तार – AI’ हे आधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या (MAFW) राष्ट्रीय विस्तार फ्रेमवर्क अंतर्गत, राज्य शासनाच्या कृषी विभागाने हे महाराष्ट्राचे स्वतंत्र कृषी नेटवर्क तयार केले आहे.

Farmers' digital friend

 बुलढाणा : महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शास्त्रशुद्ध व रिअल-टाइम कृषिविषयक सल्ला देऊन सक्षम करण्याच्या उद्देशाने ‘महाविस्तार – AI’ हे आधुनिक डिजिटल व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या (MAFW) राष्ट्रीय विस्तार फ्रेमवर्क अंतर्गत, राज्य शासनाच्या कृषी विभागाने हे महाराष्ट्राचे स्वतंत्र कृषी नेटवर्क तयार केले आहे.

महाविस्तारच्या माध्यमातून हवामान, मृदा, बाजारपेठ (मंडई), शासकीय योजना यांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी व इंग्रजी भाषेतील AI-आधारित चॅटबॉटद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार व गरजेनुसार सल्ला सहज मिळतो. शेतीतील गुंतागुंतीची माहिती आणि प्रत्यक्ष निर्णय यातील दरी कमी करण्याचे महत्त्वाचे काम महाविस्तार करत आहे.

अॅपद्वारे मिळणार सर्वांगीण माहिती
महाविस्तार अॅप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर mahaVISTAAR-AI असे सर्च करून अॅप इन्स्टॉल करता येईल. अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुढील विषयांवर सविस्तर माहिती उपलब्ध होते—

  1. पीक सल्ला : पिकाच्या पूर्वमशागतीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन.

  2. SOP (प्रमाणित कार्यपद्धती) : विविध पिकांच्या लागवडीसाठी प्रमाणित शेती पद्धती.

  3. मृदा आरोग्य पत्रिका : शेतकऱ्यांच्या मातीच्या तपशीलवार अहवालाची माहिती.

  4. खत मात्र गणक : शेतीचे क्षेत्र व उपलब्ध नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश यांच्या आधारे योग्य खत मात्रेची गणना.

  5. हवामानानुकूल शेती पद्धती : बदलत्या हवामानाला सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन.

  6. कीड व रोग व्यवस्थापन : पिकनिहाय रोग, किडी व त्यावरील उपाययोजना.

  7. बाजारभाव : जिल्हानिहाय व पिकनिहाय रिअल-टाइम बाजारभाव.

  8. गोदाम उपलब्धता : जिल्हानिहाय गोदामांची माहिती व संपर्क क्रमांक.

महाविस्तार AI चॅटबॉटचे वैशिष्ट्य
आंतरराष्ट्रीय पातळीवरील चॅटबॉट उपलब्ध असले तरी, महाराष्ट्रातील स्थानिक विद्यापीठांच्या मार्गदर्शनाचा समावेश असलेला आणि राज्याच्या शेती परिस्थितीला अनुरूप असा महाविस्तार AI चॅटबॉट प्रथमच विकसित करण्यात आला आहे. हवामान, मृदा, मंडई, उपकरणे, गोदामे व शासकीय योजना यांची एकत्रित माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांना योग्य व वेळेवर निर्णय घेणे सोपे होणार आहे.

शेतकरी महाविस्तार AI अॅप किंवा
http://vistaar.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन मराठी किंवा इंग्रजी भाषेत चॅट करू शकतात. लवकरच शेतकऱ्याचा आवाज ओळखून संवाद साधण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.

शाश्वत शेतीकडे एक पाऊल
भविष्यात या ओपन नेटवर्कच्या माध्यमातून विविध सेवा प्रदाते open standards व registry आधारे शेतकऱ्यांना सुरक्षितपणे सेवा देऊ शकतील. महाविस्तारच्या जडणघडणीत एकस्टेप फाउंडेशन या संस्थेचा मोलाचा वाटा आहे.

महाविस्तार – AI हे शाश्वत शेती, डिजिटल सक्षमीकरण आणि समृद्ध गावांच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत असून, शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘डिजिटल मित्र’ बनत आहे.

शेतकर्रयांना खालील क्यूआर कोड स्कॅन करूनही हे अॅप घेता येणार आहे.

ai chat bot

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top