Deputy Tehsildar Sayyad Ahsanoddin :तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी नायब तहसीलदार सय्यद अहसानोद्दीन यांचा आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा दिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्यकाळामुळे ते अधिकारी व नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेकांना मार्गदर्शन व मदत मिळाली असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने भावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

बाळापूर तहसीलमध्ये सत्कार सोहळा; सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना शुभेच्छांचा वर्षाव
जाकीर अहमद
बाळापूर : तहसील कार्यालयातील कर्तव्यदक्ष अधिकारी नायब तहसीलदार सय्यद अहसानोद्दीन यांचा आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्तीचा दिवस साजरा करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्यकाळामुळे ते अधिकारी व नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले होते. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे अनेकांना मार्गदर्शन व मदत मिळाली असल्याने त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने भावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी बाळापूर येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वस्त दुकानदार संघटनेचे अध्यक्ष हाजी अब्दुल रहमान कुरेशी यांच्या वतीने सय्यद अहसानोद्दीन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. “सय्यद अहसानोद्दीन साहेबांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सेवा बजावली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता दिसून आली,” असे गौरवोद्गार हाजी कुरेशी यांनी काढले. यावेळी हाजी अब्दुल रहमान कुरेशी यांचे चिरंजीव गुफरान अहमद कुरेशी यांनीही उपस्थित राहून सय्यद साहेबांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी सदिच्छा व्यक्त केली. सय्यद अहसानोद्दीन यांच्या निवृत्तीमुळे तहसील कार्यालयात एक अनुभवी आणि समर्पित अधिकाऱ्याची उणीव भासणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. त्यांच्या सेवेमुळे अनेक प्रशासकीय कामांना गती मिळाली होती. त्यांच्या निरोप समारंभात स्नेह, आदर आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त होताना दिसली.

