Mahabreaking

[breaking_news]

loan waivers :कर्जमाफी झाली, तरी शेतकऱ्यांचे हेलपाटे सुरूच! साखरखेर्डा एसबीआयच्या कारभारावर नाराजी

loan waivers : शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही अनेक शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची दखल घेत २७ ऑक्टोबर रोजी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बँकेचे शाखाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय थांबवली नाही, तर बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

loan waivers

 कर्जमाफीच्या यादीत नाव, तरी कागदपत्रांचा ससेमिरा; शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्याची मागणी

साखरखेर्डा   : शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली असली, तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्जमाफीच्या यादीत नाव असूनही अनेक शेतकऱ्यांना विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकाराची दखल घेत २७ ऑक्टोबर रोजी शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बँकेचे शाखाधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची मागणी केली. तसेच शेतकऱ्यांची गैरसोय थांबवली नाही, तर बँकेसमोर आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी सचिन खेडकर यांची बदली झाल्यानंतर अमोल खोडके यांनी शाखाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, शासनाने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायक यांच्या संयुक्त पंचनाम्यांद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली. त्यानंतर कर्जमाफीच्या पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या याद्या जाहीर झाल्या.

मात्र, पहिल्या यादीत नाव आलेल्या काही शेतकऱ्यांनाही आता विविध कागदपत्रे सादर करण्यासाठी बँकेत चकरा माराव्या लागत असल्याची तक्रार आहे. कर्ज घेताना संबंधित कागदपत्रे यापूर्वीच सादर केलेली असतानाही कर्जमाफीच्या प्रक्रियेत पुन्हा कागदपत्रांची मागणी होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांची फरफट

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आधार क्रमांकात त्रुटी असल्यास पुन्हा अर्ज सादर करून त्याची प्रत बँकेत देण्यास सांगितले जाते. काही प्रकरणांत सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याचा, तर काहींना दुय्यम निबंधक कार्यालय, सिंदखेड राजा येथे अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला जात असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर महिनाभराने पुन्हा येण्यास सांगितले जात असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे.

काही कामे बँकेच्या स्तरावरच मार्गी लागावीत, अशी अपेक्षा असताना शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयांत पाठविले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मृत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रकरणांतही संबंधित वारसांना सिंदखेड राजा येथे जाण्यास सांगितले जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय प्रक्रियेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

शिवसेना-काँग्रेस नेत्यांची शाखाधिकाऱ्यांशी भेट

या प्रकाराबाबत जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवदास रिंढे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रवींद्र पाटील आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनराव लोढे यांनी २७ ऑक्टोबर रोजी बँकेचे शाखाधिकारी अमोल खोडके यांची भेट घेतली.

यावेळी कर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास होऊ नये, कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत स्पष्ट मार्गदर्शन करावे आणि पात्र शेतकऱ्यांची प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना वारंवार बँक आणि इतर कार्यालयांत जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी बँक प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

अन्यथा बँकेसमोर आंदोलनाचा इशारा

कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याची मागणी या नेत्यांनी केली. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करून पात्र लाभार्थ्यांची प्रकरणे विनाविलंब निकाली काढावीत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही आणि त्यांच्या अडचणी दूर झाल्या नाहीत, तर भारतीय स्टेट बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना-काँग्रेसच्या नेत्यांनी दिला आहे.

दरम्यान, कर्जमाफीच्या प्रक्रियेत कागदपत्रांची पूर्तता आणि तांत्रिक त्रुटींच्या नावाखाली शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी बँक प्रशासनाने स्पष्ट सूचना द्याव्यात आणि पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top