Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

Equality Day : जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालयात समता दिन साजरा

Equality Day : शिक्षणाचे प्रणेते, सार्वजनिक सत्यधर्माचे प्रवर्तक आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय, कुंभारी येथे समता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Equality Day
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

बोरगाव मंजू : शिक्षणाचे प्रणेते, सार्वजनिक सत्यधर्माचे प्रवर्तक आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त जय बजरंग कनिष्ठ महाविद्यालय, कुंभारी येथे समता दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. श्रीराम पालकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. प्रफुल देशमुख, प्रा. शारदा बावनेर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पूजन व हार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर प्रा. शारदा उमाळे, प्रा. दिलीप अपतूरकर व प्रा. अशोक भराड यांनी महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सत्यशोधक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

या प्रसंगी बोलताना पर्यवेक्षक प्रा. श्रीराम पालकर म्हणाले की, महात्मा फुल्यांचे विचार प्रत्येक घराघरात रुजले पाहिजेत; त्यांची विचारसरणी आजही समृद्ध भारताच्या विकासासाठी तितकीच उपयुक्त आहे.

कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रा. अशोक रहाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अपर्णा खुमकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी नारायणराव धनागरे, रवींद्र कल्याणकर यांनी सहकार्य केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top