Mahabreaking

[breaking_news]

Encroachment persists : न्यायालयीन आदेशानंतरही अतिक्रमण कायम; चिंचखेडमध्ये ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात एल्गार!

Encroachment persists : तालुक्यातील मौजे चिंचखेड येथील शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून ती शासनाच्या ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ७ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

Encroachment

  सरकारी जमीन अतिक्रमणाच्या विळख्यात; कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थ उपोषणावर!

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील मौजे चिंचखेड येथील शासकीय ई-क्लास जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून ती शासनाच्या ताब्यात घेण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी ७ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी चिंचखेड येथे भेट देऊन उपोषणकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.

चिंचखेड येथील शासकीय ई-क्लास जमिनीच्या गट क्रमांक २२५, २२६, २३६ व २३७ मधील अतिक्रमणाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचिका क्र. ७४९/२०२२ मध्ये २२ जून २०२३ रोजी आदेश पारित झाल्याचे ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.

संबंधित शासकीय जमिनीचे सीमांकन व मोजणी झालेली असून, अतिक्रमण हटविण्याच्या अनुषंगाने तहसीलदार, देऊळगाव राजा यांच्याकडून आदेश अथवा कार्यवाही करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, न्यायालयीन आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्यक्ष अतिक्रमण हटविण्याची कारवाई अद्याप झालेली नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने आता केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्षात अतिक्रमण हटवावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अतिक्रमणधारकांकडून १४ ऑगस्ट २०२६ रोजी सादर करण्यात आलेल्या अर्जाच्या कारणावरून कायदेशीर कार्यवाहीला अनावश्यक विलंब होऊ नये, अशी मागणीही करण्यात आली आहे.

शासकीय जमिनीच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पाऊल उचलावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सुरेश वायाळ यांच्यासह चिंचखेड येथील अनेक ग्रामस्थ या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top