Mahabreaking

[breaking_news]

Elderly man commits suicide :देऊळगाव राजातील शिंगणे नगरात वृध्दाची गळफास घेवून आत्महत्या

Elderly man commits suicide : शहरातील शिंगणे नगर परिसरात राहणाऱ्या 80 वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 1 जुलै रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. रामकिसन हिमंतराव दंदाले (वय 80), रा. खल्याळ गव्हाण, ह.मु. शिंगणे नगर, देऊळगाव राजा, असे मृत वृद्धाचे नाव आहे.

Elderly man commits suicide
देऊळगाव राजा पोलिसांचा तपास सुरू : आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात

गजानन तिडके 
देऊळगाव राजा : शहरातील शिंगणे नगर परिसरात राहणाऱ्या 80 वर्षीय वृध्दाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना 1 जुलै रोजी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. रामकिसन हिमंतराव दंदाले (वय 80), रा. खल्याळ गव्हाण, ह.मु. शिंगणे नगर, देऊळगाव राजा, असे मृत वृद्धाचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामकिसन हिमंतराव दंदाले यांनी 1 जुलै रोजी सायंकाळी 6.45 वाजण्यापूर्वी गळफास घेतला. त्यानंतर नातेवाईक अशोक शेळके यांनी रामकिसन दंदाले यांना उपचारासाठी देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
ग्रामीण रुग्णालयातील कक्षसेवक देवानंद बबन घुगे यांनी दिलेल्या खबरवरून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या एमएलसी मेमो क्रमांक 3709/2026 च्या आधारे देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायमी मर्ग क्रमांक 26/2026 अन्वये कलम 194 बीएनएसएस अंतर्गत नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाची नोंद पोलीस हेडकॉन्स्टेबल गजानन काकड यांनी केली असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद गवई करीत आहेत. दरम्यान, शहरातील शिंगणे नगर परिसरात घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top