Eicher truck and bike collide : भरधाव आयशर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना अकोला–बाळापूर महामार्गावर व्याळा नजीक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.

अकोला–बाळापूर महामार्गावरील व्याळा नजीकची घटना
ज़ाकिर अहमद
बाळापूर : भरधाव आयशर ट्रक आणि दुचाकीची धडक झाल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना अकोला–बाळापूर महामार्गावर व्याळा नजीक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (क्र. एमएच ४८ सीबी ४८२२) अकोला येथून बाळापूरकडे जात असताना, व्याळा परिसरात बाळापूरहून अकोल्याकडे येणाऱ्या अॅक्टिव्हा दुचाकीला धडक दिली . या अपघातात दुचाकी चालक सलीमोद्दीन हसीनोदिन (वय ४०, रा. भागवत वाडी, डाबकी रोड, अकोला) गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी बाळापूर पोलीस स्टेशन येथे अक्रम खान बिस्मिल्ला खान (रा. सिंधी कॅम्प, अकोला) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आयशर ट्रक चालक चंदनलाल यादव (रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व्याळा बिटचे कर्मचारी अविनाश आळे, आकाश राठोड आणि संदीप पवार करीत आहेत.

