Mahabreaking

[breaking_news]

delay in the inquiry report :चौकशी अहवाल रखडल्याने पातूर पं.स.मध्ये आत्मदहनाचा इशारा 

delay in the inquiry report : पातूर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. ग्रामपंचायतीत लाखो रुपयांच्या कथित अपहार प्रकरणाची चौकशी करूनही अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त तक्रारदार संघपाल संसारे यांनी चक्क आत्मदहनाची चेतावणी दिल्याने पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. २४ डिसेंबर रोजी ते पेट्रोलची बाटली घेऊन थेट पातूर पंचायत समिती कार्यालयात पोहोचले होते. मात्र, गटविकास अधिकारी (बीडीओ) कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलला.

Due to the delay in the inquiry report,
वहाळा बु. ग्रामपंचायत अपहार प्रकरण; पेट्रोल हातात घेऊन आंदोलन, व्हिडिओ व्हायरल

राहुल सोनाेने 

दिग्रस बू : पातूर पंचायत समिती अंतर्गत वहाळा बु. ग्रामपंचायतीत लाखो रुपयांच्या कथित अपहार प्रकरणाची चौकशी करूनही अहवाल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संतप्त तक्रारदार संघपाल संसारे यांनी चक्क आत्मदहनाची चेतावणी दिल्याने पंचायत समितीत खळबळ उडाली आहे. २४ डिसेंबर रोजी ते पेट्रोलची बाटली घेऊन थेट पातूर पंचायत समिती कार्यालयात पोहोचले होते. मात्र, गटविकास अधिकारी (बीडीओ) कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांनी आत्मदहनाचा निर्णय तात्पुरता पुढे ढकलला.

संघपाल संसारे यांनी वहाळा बु. ग्रामपंचायतीचे सचिव सागर रोठे यांनी ग्रामपंचायत निधीचा लाखों रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. अनेक कामे केवळ कागदोपत्री दाखविण्यात आली, तर काही कामे जवळच्या कंत्राटदाराला देऊन निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा दावा त्यांनी वारंवार लेखी तक्रारींद्वारे गटविकास अधिकाऱ्यांकडे केला होता. या तक्रारीनंतर कागदोपत्री चौकशी करण्यात आली, मात्र चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप देण्यात आलेला नाही. प्रशासनाकडून होत असलेल्या या दिरंगाईमुळे आक्रमक झालेल्या संघपाल संसारे यांनी आत्मदहनाचा टोकाचा इशारा दिला आहे.

पेट्रोल हातात घेऊन चेतावणी; व्हिडिओ व्हायरल

अपहार प्रकरणाचा अहवाल देण्यात येत नसल्याच्या निषेधार्थ पेट्रोलने भरलेली बाटली हातात घेऊन आत्मदहनाची चेतावणी देतानाचा संघपाल संसारे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे प्रशासकीय यंत्रणेवर टीकेची झोड उठली आहे.

बीडीओंच्या उपस्थितीत आत्मदहनाचा इशारा

२४ डिसेंबर रोजी गटविकास अधिकारी कार्यालयात नसल्याने आत्मदहन टळले असले, तरी चौकशी अहवाल तत्काळ न दिल्यास बीडीओंच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करणार असल्याचा इशारा संघपाल संसारे यांनी दिला आहे.या प्रकरणामुळे पातूर पंचायत समितीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top