Mahabreaking

[breaking_news]

Drizzle continues :साखरखेर्डा परिसरात सलग पाचव्या दिवशी रिमझिम; शेतकऱ्यांना दिलासा, पेरणीला वेग

Drizzle continues :गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. साखरखेर्डा परिसरात सलग पाचव्या दिवशीही रिमझिम पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरत असून, कपाशी व सोयाबीन पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.

Drizzle continues

  रिमझिम पावसाने खुलली शेती; हळद लागवड यशस्वी, कपाशी व सोयाबीन पेरणीला सुरुवात

साखरखेर्डा : गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. साखरखेर्डा परिसरात सलग पाचव्या दिवशीही रिमझिम पावसाची संततधार सुरू असून, त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः हळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत लाभदायक ठरत असून, कपाशी व सोयाबीन पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने खंड दिल्याने शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत होते. “आज येईल, उद्या येईल” या आशेवर शेतकरी पावसाची वाट पाहत होता. मात्र, गेल्या सोमवारपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.

कृषी विभागाने पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी संयम बाळगला. आता गेल्या दोन दिवसांपासून जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने कपाशी लागवडीची कामे सुरू झाली असून, आज अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीलाही प्रारंभ केला आहे. शेत पेरणीयोग्य होताच ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीची लगबग सुरू झाल्याचे चित्र परिसरात दिसून येत आहे.

साखरखेर्डा परिसरात यंदा हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. सध्या सुरू असलेला रिमझिम पाऊस या पिकासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. तसेच कृषी विभागामार्फत अनेक शेतकऱ्यांना मोफत बियाण्यांचे वितरणही करण्यात आले आहे.

दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यात यंदा सुमारे ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी अपेक्षित आहे. त्यामध्ये सोयाबीन ३५ हजार हेक्टर, कपाशी २० हजार हेक्टर, हळद २ हजार हेक्टर, तूर २ हजार हेक्टर, मूग ५०० हेक्टर, उडीद ५०० हेक्टर, संकरित ज्वारी ५०० हेक्टर आणि मका ५०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

सलग सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढला असून, शेतकरी मोठ्या उत्साहाने खरीप हंगामातील पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सध्या साखरखेर्डा परिसरात पाहावयास मिळत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top