Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Dr. Sadhana Ashok Bhavete :डॉ. साधना अशोक भवटे यांना आहारशास्त्रातील पीएचडी प्रदान

Dr. Sadhana Ashok Bhavete : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आचार्य पदवीधारकांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात बुलढाण्यातील प्रथितयश भौतिकोपचार तज्ञ व आहारतज्ञ डॉ. साधना अशोक भवटे यांना फूड सायन्स अँड न्यूट्रिशन (Food Science and Nutrition) या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी आहारशास्त्र विषयात त्या विद्यापीठातील एकमेव पीएचडी पदवीधारक ठरल्या आहेत.

Sadhana Ashok Bhavete

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बहुमान

बुलढाणा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी आचार्य पदवीधारकांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या समारंभात बुलढाण्यातील प्रथितयश भौतिकोपचार तज्ञ व आहारतज्ञ डॉ. साधना अशोक भवटे यांना फूड सायन्स अँड न्यूट्रिशन (Food Science and Nutrition) या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यावर्षी आहारशास्त्र विषयात त्या विद्यापीठातील एकमेव पीएचडी पदवीधारक ठरल्या आहेत.

साखरखेर्ड्याच्या आम्रपाली गवईला पाली विषयात सुवर्णपदक

दैनंदिन वैद्यकीय प्रॅक्टिसदरम्यान महिला रुग्णांमध्ये आढळणाऱ्या हाडांच्या समस्यांचा अभ्यास करताना डॉ. भवटे यांनी या विषयावर सखोल संशोधन करण्याचा निर्णय घेतला. “बुलढाणा जिल्ह्यातील महिलांमध्ये मासिक पाळी बंद होण्यापूर्वीच हाडांची ठिसूळता वाढलेली आहे का?” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले.

Sadhana Ashok Bhavete

त्यांचे हे संशोधन डॉ. अंजली राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाले. आहारशास्त्र क्षेत्रातील गरजेच्या आणि संशोधनक्षम विषयावर अभ्यास करून त्यांनी या क्षेत्रातील सर्वोच्च शैक्षणिक बहुमान मिळविला आहे.

आवड, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कौटुंबिक सहकार्य यांच्या जोरावर महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करू शकतात, हे डॉ. साधना भवटे यांनी पुन्हा अधोरेखित केले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि दवाखान्याची धुरा सांभाळत त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य प्रेरणादायी ठरत आहे.आपल्या यशाचे श्रेय त्या पती डॉ. अशोक भवटे, कुटुंबीय आणि संशोधन मार्गदर्शक डॉ. अंजली राजवाडे यांना देतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top