Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Dr. Chandrakant Dabhere: सेवारत्न पुरस्काराने डॉ. चंद्रकांत दाभेरे सन्मानीत 

Dr. Chandrakant Dabhere: भारत गौरव गुरुवर्य अह्वाज असदबाबा मेमोरियल ट्रस्ट, सिंदखेड राजा यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सेवारत्न पुरस्कार’ वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. चंद्रकांत अंबादासजी दाभेरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दि. २५ रोजी समारंभपूर्वक देण्यात आला.

Dr. Chandrakant Dabhere

फकीरा पठाण 
मलकापूर पांग्रा  : भारत गौरव गुरुवर्य अह्वाज असदबाबा मेमोरियल ट्रस्ट, सिंदखेड राजा यांच्या वतीने देण्यात येणारा ‘सेवारत्न पुरस्कार’ वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ व सेवाभावी व्यक्तिमत्त्व डॉ. चंद्रकांत अंबादासजी दाभेरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दि. २५ रोजी समारंभपूर्वक देण्यात आला.

संपूर्ण सिंदखेड राजा तालुक्यात परिचित असलेले डॉ. दाभेरे हे वैद्यकीय क्षेत्रातील देवमाणूस म्हणून ओळखले जातात. “कपड्याला खिसा नसलेले डॉक्टर” अशी ख्याती मिळवणारे डॉ. दाभेरे यांनी अर्थकारणाचा विचार न करता गोरगरिब, गरजू रुग्णांची निस्वार्थ सेवा केली. हीच आपुलकी आणि सेवाभावना आजही तितक्याच निष्ठेने ते जपत आहेत.

सन १९७९ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातून सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी मलकापूर पांग्रा, किनगाव राजा, साखरखेर्डा तसेच ग्रामीण रुग्णालयांत तब्बल ३४ वर्षे सेवा बजावली. त्या काळात नॉर्मल प्रसूती करण्यासाठी त्यांची विशेष ख्याती होती. त्यांच्या सेवेमुळे जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल अपार आपुलकी निर्माण झाली, जी आजही कायम आहे. अनेकदा “डॉक्टर साहेब नसतील तर दुसऱ्यांना दाखवायचे नाही” अशी लोकांची भावना असायची; तासन्‌तास प्रतीक्षा करण्याची तयारी असायची.

वाहनांची मुबलक सोय नसलेल्या काळात रुग्ण रात्री-बेरात्री त्यांच्या घरी येत असत. रात्री २–३ वाजले तरी ते उठून उपचार करत. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला जालना किंवा बुलढाण्यास रेफर करायचे असल्यास, रुग्णाकडे पैसे असोत वा नसोत, स्वतःची गाडी देऊन, खिशातून पैसे खर्च करून रुग्णाला पाठवण्याची निर्मळ भावना त्यांनी जोपासली. या सेवाभावामुळे ते पंचक्रोशीत कायमचे मनात घर करून राहिले आणि “डॉ. दाभेरे काका” म्हणून ओळखले जाऊ लागले.२०१३ मध्ये शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही  त्यांनी सेवा थांबवली नाही. मलकापूर पांग्रा येथे साई हॉस्पिटलच्या माध्यमातून आजही नॉर्मल प्रसूतीसाठी ते जिल्हाभरात प्रसिद्ध आहेत. तब्बल ४६ वर्षे गोरगरिब व सर्वसामान्य रुग्णांची सेवा करणारे, ७० वर्षांचे वय पूर्ण होऊनही रुग्णसेवेत तत्पर असलेल्या या अवलियाला ‘सेवारत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आल्याने पुरस्काराची उंची अधिक वाढली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top