Mahabreaking

[breaking_news]

Dr. Alka Gode: डॉ. अलका गोडे यांना ‘स्व. डॉ. अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार’ जाहीर

Dr. Alka Gode: सन २०१४-१५ पासून स्वर्गीय डॉ. अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठान, बुलढाणा यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव जपून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना ‘स्व. डॉ. अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराच्या माध्यमातून समाजात सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, तरुण पिढी व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना प्रेरणा मिळावी तसेच “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हा संदेश अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने दरवर्षी ८ जानेवारी रोजी डॉ. खासबागे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

Dr. Alka Gode

चार दशकांच्या निस्वार्थ रुग्णसेवेची दखल; ८ जानेवारी रोजी सन्मान सोहळा

— गजानन भालेकर 

धोत्रा नंदई : सन २०१४-१५ पासून स्वर्गीय डॉ. अरुण खासबागे स्मृती प्रतिष्ठान, बुलढाणा यांच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रात सेवाभाव जपून रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांना ‘स्व. डॉ. अरुण खासबागे मानवसेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. या पुरस्काराच्या माध्यमातून समाजात सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, तरुण पिढी व वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना प्रेरणा मिळावी तसेच “रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा” हा संदेश अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने दरवर्षी ८ जानेवारी रोजी डॉ. खासबागे यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून, यावर्षी देऊळगाव मही येथील डॉ. अलका ज्ञानेश्वर गोडे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. गोडे यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा व समाजसेवा करत जनसामान्यांमध्ये विशेष नावलौकिक मिळवला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे असून, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा हॉटेल द्वारका, मलकापूर रोड, बुलढाणा येथील सभागृहात पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेत्ररोग तज्ञ डॉ. विकास बाहेकर हे राहणार असून, खामगाव येथील नेत्ररोग तज्ञ डॉ. मनीष वानखडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुरेखा मेहरअस्थिरोग तज्ञ डॉ. प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top