Makarand Patil: राज्यातील दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याची बातमी काही वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने अद्याप राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.

बुलढाणा दुष्काळग्रस्त असल्याच्या चर्चेला पालकमंत्र्यांचा खुलासा; अद्याप कोणत्याही जिल्ह्याची घोषणा नाही
गजानन तिडके
बुलढाणा : राज्यातील दुष्काळसदृश जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केली असून, त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश नसल्याची बातमी काही वृत्तपत्रे व माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. मात्र, शासनाने अद्याप राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेले नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्त अथवा दुष्काळसदृश जिल्ह्यांच्या यादीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून, नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.
जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसामध्ये पडलेले खंड, अनियमित पर्जन्यमान तसेच त्याचा पिकांच्या वाढीवर झालेला परिणाम याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिल्या आहेत. पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटणे, विविध रोगांचा प्रादुर्भाव होणे तसेच उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन खरीप पिकांचे पंचनामे करण्यात येणार आहेत.
याबाबत एनडीआरएफच्या निकषांनुसार मुख्यमंत्री लवकरच शासनस्तरावरून पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याच्या सूचना देतील. त्यामुळे सध्या दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळसदृश जिल्ह्यांची अंतिम घोषणा झालेली नसताना, यासंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या अथवा अफवांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये, असेही पालकमंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

