District Collector: पातुर तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री शेतकरी राजा ग्रुप व शिवसग्राम संघटना यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी पातुर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली.

विविध संघटनांबरोबरच ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाची घेतली दखल
राहुल साेनाेने
दिग्रस बु : पातुर तालुक्यात सततच्या पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर श्री शेतकरी राजा ग्रुप व शिवसग्राम संघटना यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सोमवार, २९ सप्टेंबर रोजी पातुर तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान कृषी अधिकारी (अकोला) शंकर किरवे, तहसीलदार पातुर राहुल वानखडे, कृषी अधिकारी राऊत, पंचायत समिती गटविकास अधिकारी नायसे, विस्तार अधिकारी लव्हाळे, तसेच श्री शेतकरी राजा ग्रुपचे सेवक ज्ञानेश्वर गाडगे यांच्या शेतात सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
यावेळी चान्नीचे तलाठी ठाकरे, विवराचे तलाठी नळकांडे, कृषी अधिकारी गांधी, कृषी सहायक अधिकारी अरुण ताले, शिवसग्राम संघटना जिल्हाध्यक्ष दिलीप परनाटे, तसेच शेतकरी राजा ग्रुपचे कार्यकर्ते रवि सोनोने, ज्ञानेश्वर गाडगे, अशोक इंगळे, यश घुगे, कुणालदेव सोनोने, बंडू इंगळे, नादानंद सोनोने, मंगेश इंगळे, सस्ती येथील रवी महाले, गोपाल शेळके, कृष्णा शेळके, पिंटू महाले, गोपाल वाघ, केशव महाले, महादेव राऊत, राजू ढोकणे, सुधा निखाडे, गोपाल टेके, गोपाल बद्रखे व अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पातुर तालुक्यात गेल्या काळात तीन वेळा अतिवृष्टी झाली असून ढगफुटीसदृश पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी खूप खचून गेले आहेत. शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई व शंभर टक्के विमा लाभ मिळायला हवा, अशी मागणी शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने रवि सोनोने यांनी केली.
दरम्यान, “पिकांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल,” असे आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी शेतकऱ्यांना दिले.

