Mahabreaking

[breaking_news]

Dispute over:  मुलीला सोबत नेण्यावरून वाद; गारगुंडीत घरात घुसून मायलेकाला मारहाण

Dispute over: मुलीला आमच्यासोबत पाठविण्याच्या कारणावरून घरात घुसून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून आठ जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गारगुंडी येथे घडली. याप्रकरणी राधाबाई भानुदास काकड (वय ४५, रा. गारगुंडी) यांनी फिर्याद दिली आहे.

Dispute

 ‘मुलगी घरी नाही’ म्हणताच घरात घुसले; मायलेकाला मारहाण, आठ जणांवर गुन्हा

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : मुलीला आमच्यासोबत पाठविण्याच्या कारणावरून घरात घुसून महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करून शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून आठ जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गारगुंडी येथे घडली. याप्रकरणी राधाबाई भानुदास काकड (वय ४५, रा. गारगुंडी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, राधाबाई काकड या त्यांचा मुलगा घरात जेवण करीत असताना आरोपींनी गैरकायदेशीररीत्या जमाव करून त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपी गणेश नारायण इलग व अर्चना राजेंद्र इलग यांनी राधाबाई यांच्याकडे त्यांच्या मुलीला आमच्यासोबत पाठविण्याची मागणी केली. त्यावर राधाबाई यांनी मुलगी घरी नसल्याचे सांगितले तसेच, ‘तुम्ही न्यायालयामार्फत घेऊन जा’, असे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यानंतर आरोपी गणेश इलग व अर्चना इलग यांनी राधाबाई यांना शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच गणेश इलग, बळीराम विठ्ठल इलग, कैलास बबन इलग, संतोष गणपत इलग, ज्ञानराज विठ्ठल इलग, अर्चना राजेंद्र इलग, सिंधु भगवान इलग आणि परीक्षीत विठ्ठल इलग या आठ जणांनी राधाबाई यांच्या मुलाला चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी सर्व आरोपींनी राधाबाई व त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीच्या तोंडी तक्रारीसह वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे पोलिसांनी अप क्रमांक ३९१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम १८९(२), ३३३, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top