Vaan Project; वान प्रकल्पातून आज, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजतापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाची दोन वक्रद्वारे प्रत्येकी २० सेंमी उंचीने उघडण्यात आली असून, त्यातून नदीपात्रात ३६.६४ घनमीटर प्रति सेकंद अर्थात १,२९४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

वान प्रकल्प ९९.७६ टक्के भरला; दोन वक्रद्वारे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू
तेल्हारा : वान प्रकल्पातून आज, दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजतापासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पाची दोन वक्रद्वारे प्रत्येकी २० सेंमी उंचीने उघडण्यात आली असून, त्यातून नदीपात्रात ३६.६४ घनमीटर प्रति सेकंद अर्थात १,२९४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
प्रकल्पात सुरू असलेली पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्गाचे प्रमाण वाढविणे अथवा कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती वान प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
प्रकल्प ९९.७६ टक्के भरला
दि. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता वान प्रकल्पाची पाणीपातळी ४११.९५ मीटर इतकी होती. प्रकल्पात ८१.७६ दशलक्ष घनमीटर (Mm³) पाणीसाठा असून, प्रकल्पाची साठवण क्षमता ९९.७६ टक्क्यांवर पोहोचली आहे.
पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये तसेच जनावरे नदीपात्रात सोडू नयेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

