Mahabreaking

🔴 BREAKING
Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

Palshi-Jhansi pilgrimage :पळशी झाशी तीर्थस्थळाच्या विकासाला मिळणार गती; दोन कोटींचा निधी मंजूर

Palshi-Jhansi pilgrimage :जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज संस्थानच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत या तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे तीर्थस्थळाच्या विकासकामांना मोठी चालना मिळणार असून परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Palshi-Jhansi pilgrimage
अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ योजनेतून होणार विकास; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार

बुलढाणा : जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज संस्थानच्या विकासासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत या तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमुळे तीर्थस्थळाच्या विकासकामांना मोठी चालना मिळणार असून परिसरातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पळशी झाशी येथील शंकरगिरी महाराज संस्थान हे बुलढाणा जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. या तीर्थस्थळाला यापूर्वीच शासनाकडून ‘ब’ दर्जाच्या तीर्थस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यामुळे या पवित्र स्थळाच्या विकासाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.
या निधीसाठी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येत १३ मार्च रोजी शासनाने यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला आहे. मंजूर निधीतून पळशी झाशी तीर्थस्थळावर भाविकांच्या सोयीसाठी भव्य सभागृह, प्रसादालय तसेच इतर विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांमुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून तीर्थस्थळाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, दिलेला शब्द पाळत तीर्थस्थळासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शंकरगिरी महाराज संस्थानच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे विश्वस्त अरुण पाटील मोरोडे यांनी जाधव यांची भेट घेऊन त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान केला व संस्थेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली. या निधीमुळे पळशी झाशी तीर्थस्थळाच्या विकासाला नवे बळ मिळणार असून भविष्यात हे ठिकाण अधिक सुबक आणि सुविधायुक्त तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top