Mahabreaking

[breaking_news]

illegal sand smugglers :अवैध रेती तस्करांवर देऊळगाव राजा पोलिसांचा शिकंजा! नऊ टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल

illegal sand smugglers : तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंडपगाव शिवारातील खडकपुर्णा जलाशय परिसरात अवैध रेती चोरीच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या नऊ टिप्पर चालकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायात गुंतलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

illegal sand

खडकपुर्णा जलाशय परिसरात रेती तस्करीचा डाव उधळला; नऊ टिप्पर पोलिसांच्या रडारवर

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मंडपगाव शिवारातील खडकपुर्णा जलाशय परिसरात अवैध रेती चोरीच्या उद्देशाने एकत्र जमलेल्या नऊ टिप्पर चालकांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध रेती व्यवसायात गुंतलेल्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

खडकपुर्णा जलाशय परिसरात मध्यरात्री संशयास्पद हालचाली

देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार, २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मंडपगाव शिवारातील खडकपुर्णा जलाशयाच्या काठावर महसूल विभाग आणि पोलीस विभागाचे संयुक्त पथक गस्तीवर होते. यावेळी रेती साठ्याजवळ नऊ टिप्पर एकत्र आल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. संबंधित टिप्पर चालक अवैधरीत्या रेती चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे जमल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी संजय तुळशीराम हांडे (वय ५५, रा. देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजून ४३ मिनिटांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक ५२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) व ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ क्रमांकित आणि एका विना क्रमांकाच्या टिप्परचा समावेश

या प्रकरणात पोलिसांनी नोंद केलेल्या टिप्परचे क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

  1. एमएच-२८-बीबी-७८६४
  2. एमएच-२८-बीबी-७४८९
  3. एमएच-२१-बीएम-८०३२
  4. एमएच-२७-बीएक्स-१८९९
  5. एमएच-२८-बीएल-९४९४
  6. एमएच-३७-जे-१६२३
  7. एमएच-२८-बीबी-०१७८
  8. एमएच-२८-बीबी-७७९८
  9. विना क्रमांकाचा पांढऱ्या रंगाचा टिप्पर (त्यावर ‘हरे कृष्णा’ असे लिहिलेले आहे).

अशा एकूण नऊ टिप्पर चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहनांच्या चालकांची ओळख आणि अवैध रेती चोरीच्या प्रकरणातील त्यांची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे (बक्कल क्रमांक ३८२) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानोबा चमकुरे यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

खडकपुर्णा जलाशय परिसरात रेती चोरीच्या उद्देशाने टिप्पर एकत्र जमल्याच्या या प्रकरणामुळे तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असून, अवैध रेती व्यवसायाविरोधातील कारवाईकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top