Mahabreaking

[breaking_news]

dry drought: कोरडा दुष्काळ जाहीर करून एकरी ५० हजारांची मदत द्या; शिवसेना ठाकरे गटाची मागणी

dry drought: सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राज्यात पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतून शेतकरी मदतीच्या मागण्या पुढे येत आहेत.

dry drought:

 कर्जमाफी, चारा छावण्या अन् वीज बिलवसुलीला स्थगिती; शेतकरी प्रश्नांवर उध्दव सेना आक्रमक

देऊळगाव राजा : सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राज्यात पावसाच्या खंडामुळे शेतीपिकांवर परिणाम झाल्याच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतून शेतकरी मदतीच्या मागण्या पुढे येत आहेत.

निवेदनात देऊळगाव राजा परिसरासह संबंधित भागात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली.

शेतमजूर व कामगारांना रोजगार हमी योजनेअंतर्गत पुरेशा प्रमाणात कामे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडील वीज बिलांसह इतर सर्व प्रकारच्या सक्तीच्या वसुलीला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

कर्जमाफीसह नवीन पीक कर्जाची मागणी

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने करण्यात यावी आणि कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही करण्यात आली. तसेच २५ जून २०२५ पूर्वीची पीक विमा योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी भूमिका यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

पदाधिकारी व शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या

या निवेदनावर शिवसेना तालुकाप्रमुख दादाराव खार्डे, माजी नगराध्यक्ष गोविंदराव झोरे, शहरप्रमुख अजय शिवरकर, युवा सेना उपतालुकाप्रमुख नितेश देशमुख, उपशहरप्रमुख मोहन खांडेभराड, योगेश मिसाळ, किशोर खेडेकर, विशाल उखळकर, अमर उडाणशिव, मंगेश इंगळे, नागेश पऱ्हाड, विजय जमधडे, राजीव नागरे, गिरीश वाघमारे, सौरभ इंगळे, गजानन घुगे, राजू पवार, अविनाश डोईफोडे, विठोबा पवार, सदाशिव मुख्यादल, गजानन मोरे, सोसे सर यांच्यासह अनेक शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेतकऱ्यांना सध्याच्या पीक परिस्थितीत तातडीची आर्थिक मदत, कर्जविषयक दिलासा, रोजगार तसेच पशुधनासाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top