Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Daring robbery : देऊळगाव राजात धाडसी चोरी : बिअर बार फोडून २.१० लाखांचा माल लंपास 

Daring robbery : शहरातील जाफ्राबाद रोडवरील प्रतीक बिअर बार येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ९ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Daring robbery

गजानन तिडके
देऊळगाव राजा : शहरातील जाफ्राबाद रोडवरील प्रतीक बिअर बार येथे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ९ हजार ७५४ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी जनार्धन बाबुराव शिवरकर (वय ४०, व्यवसाय – बिअर बार मालक, रा. शिंगणे गनर, ता. देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, दि. २४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजेपासून ते दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी प्रतीक बिअर बारच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील विदेशी कंपनीची दारू किंमत २,०६,७५४ रुपये, तसेच बिअर बारमध्ये बसवलेला सीपी प्लस कंपनीचा डीव्हीआर (अंदाजे ३,००० रुपये) असा एकूण २,०९,७५४ रुपयांचा एवज लंपास केला. यासोबतच दुकानात बसवलेले ६ सीसीटीव्ही कॅमेरे फोडून अंदाजे २,००० रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे.
या घटनेबाबत देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दाखल करण्यात आला. या प्रकरणाची नोंद पोहेकॉ विश्वनाथ काकड यांनी केली आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोउपनि व्ही. एच. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक बाबींच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत. शहरात वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top