Mahabreaking

[breaking_news]

Dr. Rajendra Shingne :डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचा जल्लोष; एक लाखाचे बक्षीस आकर्षण

Dr. Rajendra Shingne :माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने साखरखेर्डा येथे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २९ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

Dr. Rajendra Shingne

साखरखेर्डा : माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने साखरखेर्डा येथे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन २९ मार्च रोजी जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

या स्पर्धेला परिसरातील युवकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून तब्बल एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे.

डॉ. शिंगणे यांचा साखरखेर्डा परिसरात आजही प्रभाव कायम असून सहकार व राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा असल्याचे मानले जाते. सत्तेत असोत किंवा नसोत, त्यांच्या कार्यकर्त्यांची मजबूत फळी कायम सक्रिय असल्याचे या आयोजनातून पुन्हा एकदा दिसून आले.

दरम्यान, ३० मार्च रोजी डॉ. शिंगणे यांचा ६५ वा वाढदिवस असून, दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा करू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानुसार वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात येत असला, तरी युवकांच्या सहभागातून क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी माजी सभापती शिवाजीराजे देशमुख, सतीश काळे, जगन मामा सहाने, राजेंद्र ठोके, विजय मोहने, इब्राहिम शहा, रामदाससिंग राजपूत, संग्रामसिंह राजपूत, सुनील रिंढे, अरुण देशमुख, शुभम राजपूत, अमित जाधव, नितीन ठोसरे, डी.एन. पांचाळ, सुधीर राजपूत, बबलू पवार, आदित्य तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी केले असून, पुढील काही दिवसांपर्यंत सामने रंगणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top