Mahabreaking

[breaking_news]

Crackdown on sand mafia: रेती माफीयांवर धडक कारवाई:८ टिप्पर जप्त; १ कोटी ६२ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Crackdown on sand mafia: जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मलकापूर तालुक्यातील मौजा नरवेल परिसरातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी ८ टिप्पर वाहने व १६ ब्रॉस वाळू संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आली असून, अंदाजे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crackdown on sand mafia
आठ आरोपींवर गुन्हा दाखल ; मलकापूर महसूल आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई

बुलढाणा : जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात प्रशासनाने कडक भूमिका घेत धडक कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मलकापूर तालुक्यातील मौजा नरवेल परिसरातील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारी ८ टिप्पर वाहने व १६ ब्रॉस वाळू संयुक्त कारवाईत जप्त करण्यात आली असून, अंदाजे १ कोटी ६२ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. या प्रकरणी ८ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास केली.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास पोलीस स्टेशन एमआयडीसी मलकापूर हद्दीतील नरवेल–कोटेश्वर मंदिर शिवारात पेट्रोलिंग सुरू असताना जमुनापुरी घाटातून मलकापूरकडे शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे तहसीलदार, महसूल कर्मचारी व पंचांसह नाकाबंदी करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान संशयास्पदरीत्या येणारी ८ टिप्पर वाहने थांबवून तपासणी केली असता, वाहनचालकांकडे वाळू वाहतुकीसाठी कोणतीही वैध परवानगी नसल्याचे आढळून आले. पंचासमक्ष तपासणीत प्रत्येकी सुमारे २ ब्रॉस वाळू असे एकूण १६ ब्रॉस वाळू (अंदाजे किंमत २ लाख रुपये) तसेच प्रत्येकी अंदाजे २० लाख रुपये किमतीची ८ टिप्पर वाहने जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १ कोटी ६२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

मलकापूर येथील सहा तर नांदुरा येथील दोघांवर गुन्हा

या प्रकरणी पोलीस स्टेशन एमआयडीसी दसरखेड पोलीस स्टेशनमध्ये आठ जणांविरुध्द कलम ३०३(२) भा.न्या.सं. सह कलम २१(१), २१(२) गौण खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये मलकापूर येथील ६ जण, तर नांदुरा व मोताळा येथील प्रत्येकी एका आरोपीचा समावेश आहे.जप्त करण्यात आलेल्या टिप्पर वाहनांचे क्रमांक MH-28-BB-6174, 2895, 4414, 4172, 1210, 8910, 7935 व 7397 असे आहेत. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top