Mahabreaking

[breaking_news]

Couple assaulted :शेतातील केबलच्या वादातून घरात घुसून दाम्पत्याला मारहाण; जातीवाचक शिवीगाळप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

Couple assaulted : शेतातून केबल नेण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट घरात घुसून मारहाण करण्याच्या घटनेत झाले. मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. यावेळी आरोपींनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Couple

केबलच्या वादाने गाठले टोक; घरात घुसून पती-पत्नीस मारहाण, जीवे मारण्याची धमकी

डोणगाव : शेतातून केबल नेण्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान थेट घरात घुसून मारहाण करण्याच्या घटनेत झाले. मेहकर तालुक्यातील उमरा देशमुख येथे पूर्ववैमनस्यातून एका कुटुंबाला लक्ष्य करण्यात आल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. यावेळी आरोपींनी घरात अनधिकृतपणे प्रवेश करून पती-पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच जातीवाचक व अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केबलच्या कारणावरून घरात घुसून मारहाण

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन गजानन गवई (वय ५०, व्यवसाय शेतमजुरी, रा. उमरा देशमुख, ता. मेहकर) हे आपल्या कुटुंबासह गावात राहतात. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास मोहन गवई आणि त्यांची पत्नी घरी असताना गावातीलच तीन जणांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश केला.

शेतातून केबल नेण्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. हा वाद वाढत गेल्यानंतर आरोपींनी मोहन गवई आणि त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी जातीवाचक व अश्लील शब्दांत शिवीगाळ करून पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पहाटे पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर मोहन गजानन गवई यांनी डोणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी फिर्यादीवरून १७ नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे १ वाजून १६ मिनिटांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल आरिफ शेख यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळाला भेट

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगोले आणि पोलीस उपनिरीक्षक विजय अजमेरे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे करीत आहेत.

पाझर तलावातील पाणी उपशाचा प्रश्नही ऐरणीवर

दरम्यान, उमरा देशमुख येथील पाझर तलावातून पाणी उपसा करण्यावर बंदी असल्याचे सांगितले जात असतानाही तलावातून सर्रास पाणी उपसा सुरू असल्याचा मुद्दा स्थानिक पातळीवर चर्चेत आहे. या पाणी उपशावरून गावात वारंवार वाद निर्माण होत असल्याचेही समोर येत आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पाझर तलावातील पाणी उपशाची वस्तुस्थिती तपासावी आणि नियमांचे उल्लंघन होत असल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top