Mahabreaking

🔴 BREAKING
Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’ Firefight in Anvi Mirzapur: अन्वी मिर्झापूर येथे अग्नी तांडव ; घराला लागलेल्या आगीत 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू Speeding car: भरधाव कार रस्त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीत कोसळली, पती-पत्नीचा मृत्यू Malkapur depot driver’s : मलकापूर आगार बस चालकाचे जेष्ठ नागरिकांसोबत उद्धट वर्तन; कारवाईची मागणी substation in Sakharkherda: साखरखेर्डा येथील वीज वितरण उपकेंद्रातील कार्यालय, निवासस्थानांची दयनीय अवस्था contesting the election: निवडणूक लढवत आहात, तर व्हिजन काय?  ‘Farmer Cup : अकोला तालुका ‘फार्मर कप एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण’

Container full of buffaloes seized: म्हशींनी भरलेला कंटेनर पकडला; तब्बल ४८ लाखांचा मुद्देमाल जप्त

Container full of buffaloes seized: जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी “ऑपरेशन प्रहार” मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत पातूर पोलिसांनी म्हशींची क्रूरपणे वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली. मात्र, या घटनेनंतरही रात्री उशिरापर्यंत पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.

buffaloes seized

“ऑपरेशन प्रहार” अंतर्गत पातूर पोलिसांची धडक कारवाई!

संजय गोतरकर

पातूर : जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार अकोला जिल्ह्यात अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी “ऑपरेशन प्रहार” मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत पातूर पोलिसांनी म्हशींची क्रूरपणे वाहतूक करणारा कंटेनर पकडून तब्बल ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता करण्यात आली. मात्र, या घटनेनंतरही रात्री उशिरापर्यंत पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे.

पोलिस निरीक्षकांना माहिती मिळाली की, एका कंटेनरमधून म्हशींची गर्दी करून आणि कोणतीही सुविधा न देता क्रूरपणे वाहतूक करण्यात येत आहे. तत्काळ सावरखेड टोल नाका येथे नाकाबंदी करण्यात आली. या वेळी केएचआर-७३ बी-००५६ क्रमांकाचा कंटेनर आल्यावर पोलिसांनी त्याला थांबवले.

तपासाअंती, त्या कंटेनरमध्ये ५१ म्हशींना दोऱ्यांनी घट्ट बांधून, अती दाटीवाटीत ठेवण्यात आले असल्याचे आढळले. कंटेनरमधून चालक नासीर खान जुबेर खान (वय २३, रा. घासेरा, ता. नुह, जि. नुह, राज्य हरियाणा) याला अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईत  ५१ म्हशी, किंमत ₹८,००,०००,कंटेनर (क्रमांक केएचआर-७३ बी-००५६), किंमत ₹४०,००,००० असा ऐवज जप्त केलासदर चालकाविरुद्ध पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणमंत डोपेवाड, पोहेकॉ. मनोज ठाकूर (ब. क्र. १३९३), पो. कॉ. नदीम (ब. क्र. २३७५), आणि चालक पोहेकॉ. ठाकरे (ब. क्र. २०१) यांनी केली. दरम्यान, कारवाई झाल्यानंतर गुन्हा नोंदविण्यास उशीर का झाला याबाबत स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आले. रात्री ड्युटीवर असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा दोन ते तीन वेळा प्रयत्न करण्यात आला, परंतु त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती मिळाली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top