Mahabreaking

[breaking_news]

Class 10th exams :दहावीच्या परीक्षेला शांततेत सुरुवात; कडेकोट बंदोबस्तात मराठीचा पेपर

Class 10th exams : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. पहिला मराठी विषयाचा पेपर देऊळगाव राजा पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागाच्या नियोजनात पार पडला.

Class 10th exams

गजानन भालेकर

धोत्रा नंदाई  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या परीक्षेला बुधवारी शांततेत सुरुवात झाली. पहिला मराठी विषयाचा पेपर देऊळगाव राजा पंचायत समितीअंतर्गत शिक्षण विभागाच्या नियोजनात पार पडला.

देऊळगाव मही येथील शिवाजी हायस्कूल देऊळगाव मही या परीक्षा केंद्रावर एकूण ४७५ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा सुरळीत व पारदर्शक पद्धतीने सुरू असून केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

कॉपीमुक्त परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात आल्या असून भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकाकडून अचानक तपासण्या करण्यात येत असून पहिल्याच पेपरला कडक शिस्त व नियंत्रण दिसून आले.

परीक्षाकाळात प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. देऊळगाव राजा पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांनी स्वतः सुमारे एक तास केंद्रावर तळ ठोकून परिस्थितीची पाहणी केली.एकूणच, दहावीची परीक्षा शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळाले.

देशभरातील बातम्या वाचवण्यासाठी भारत या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top