Mahabreaking

[breaking_news]

case registered: शिक्षण व लग्नासाठी केलेल्या खर्चाचे पैसे मागितल्यावर नातेवाइकांमध्ये राडा; चौघांविरुद्ध गुन्हा

case registered:  शिक्षण आणि लग्नासाठी तसेच अडचणीच्या काळात केलेल्या खर्चाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून नातेवाइकांमध्ये वाद होऊन महिलेसह तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना देऊळगाव राजा शहरातील शिंगणे नगर परिसरात २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Case registered

 महिलेला मारहाण करून विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा आरोप; देऊळगाव राजात चौघांवर गुन्हा दाखल

गजानन तिडके 

देऊळगाव राजा : शिक्षण आणि लग्नासाठी तसेच अडचणीच्या काळात केलेल्या खर्चाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून नातेवाइकांमध्ये वाद होऊन महिलेसह तिच्या पतीला मारहाण केल्याची घटना देऊळगाव राजा शहरातील शिंगणे नगर परिसरात २६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून विलास दिनकर बुरकुले, सुरज विलास बुरकुले, सुयोग विलास बुरकुले आणि संगीता विलास बुरकुले (सर्व रा. शिंगणे नगर, देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. फिर्यादी यांनी आरोपी क्रमांक एक यांच्याकडे त्यांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी तसेच अडचणीच्या काळात केलेल्या खर्चाचे पैसे मागितले. या कारणावरून आरोपींमध्ये वाद झाला.

तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक १ ते ४ यांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीला चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी खाली पडल्यानंतरही त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच आरोपी क्रमांक २ याने वाईट उद्देशाने फिर्यादीचा हात धरून त्यांच्या ब्लाउज व साडीला ओढल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या झटापटीदरम्यान फिर्यादी यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटून खाली पडले. ते त्यांनी उचलून स्वतःजवळ ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपी क्रमांक १ याने फिर्यादी व त्यांच्या पतीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

घटनेनंतर फिर्यादी यांना वैद्यकीय तपासणी व उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे पाठविण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, जालना येथे रेफर केले. मात्र फिर्यादी जालना येथे न जाता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आणि त्यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी कायमी अप क्रमांक ४३८/२०२६ नुसार कलम ७४, ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) BNS अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जायभाये (बक्कल क्रमांक १०९०) यांनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गिते करीत आहेत. ही घटना २६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता घडली असून, त्याच दिवशी दुपारी १.४२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top