Mahabreaking

[breaking_news]

Child Marriage of Minor Girl :अल्पवयीन मुलीचा विवाह होण्यापूर्वीच रोखला ; किन्ही पवार येथे देऊळगाव राजा पोलिसांची धडक कारवाई  

Child Marriage of Minor Girl : तालुक्यातील किन्ही पवार येथे एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह लावण्यापूर्वीच देऊळगाव राजा पोलिसांनी रोखला.  २ मे २०२६ रोजी CCTNS प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही धडक  कारवाई केली.

Child Marriage of Minor Girl

गजानन तिडके

देऊळगाव राजा : तालुक्यातील किन्ही पवार येथे एका १५ वर्षीय बालिकेचा विवाह लावण्यापूर्वीच देऊळगाव राजा पोलिसांनी रोखला.  २ मे २०२६ रोजी CCTNS प्रणालीवर प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही धडक  कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, १८ वर्षांखालील मुलीचा विवाह 2 मे रोजी होणार असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक पाठवले. या पथकात पोउपनि राजकुमार मोहोळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

पोलिसांनी किन्ही पवार येथे पोहोचून माहितीची पडताळणी केली असता, संबंधित मुलगी (वय १५ वर्षे ६ महिने) ही आई-वडिलांसोबत आढळली. त्या ठिकाणी विवाहपूर्व विधी सुरू असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून हा बालविवाह थांबवला. यानंतर संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी, पोउपनि राजकुमार मोहोळकर, मपोउपनि विकार पटेल, एएसआय प्रमोद मुळे, पोहेकॉ रामकिसन गिते, समाधान गिते, महिला पोलीस कॉन्स्टेबल शितल नांदे तसेच चालक विजय दराडे यांनी सहभाग घेतला.

१८ वर्षांखालील मुली व २१ वर्षांखालील मुलांचे विवाह करणे हा कायद्याने गुन्हा असून, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना स्वावलंबी बनवावे आणि योग्य वय झाल्यानंतरच विवाहाचा विचार करावा. तसेच, समाजातील सुजाण नागरिकांनी कुठेही बालविवाह होत असल्याची माहिती प्रशासनाला द्यावी आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे.

ब्रम्हा गिरी, पोलीस निरीक्षक, देऊळगाव राजा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top