Mahabreaking

[breaking_news]

Kailash Maharaj Nirmal :सुखप्राप्तीसाठी हरिनामाची शिदोरी आवश्यक – कैलास महाराज निर्मळ यांचे प्रबोधन

Kailash Maharaj Nirmal : प्रापंचिक जीवनात भूक लागल्यावर जशी शिदोरीची गरज असते, तशीच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती साधायची असेल तर हरिनामाची शिदोरी आवश्यक आहे. तेव्हाच प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवन सुखी होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण हितोपदेश कैलास महाराज निर्मळ यांनी उपस्थित भाविकांना केला. ते परिसरातील मौजे पेनटाकळी येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनातून प्रबोधन करत होते.

Kailash Maharaj Nirmal

साखरखेर्डा : प्रापंचिक जीवनात भूक लागल्यावर जशी शिदोरीची गरज असते, तशीच आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून परमानंदाची प्राप्ती साधायची असेल तर हरिनामाची शिदोरी आवश्यक आहे. तेव्हाच प्रापंचिक आणि पारमार्थिक जीवन सुखी होऊ शकते, असा महत्त्वपूर्ण हितोपदेश कैलास महाराज निर्मळ यांनी उपस्थित भाविकांना केला. ते परिसरातील मौजे पेनटाकळी येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजित काल्याच्या कीर्तनातून प्रबोधन करत होते.

पेनटाकळी येथे महाशिवरात्रीनिमित्त ८ फेब्रुवारीपासून गत सप्ताहात संगीत महाशिवरात्री शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. ८ ते १५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या या सोहळ्यात दररोज सकाळी काकडा आरती, दुपारी संगीत महाशिवरात्री शिवपुराण कथा, सायंकाळी हरिनाम व रात्री कीर्तन असे भावभक्तीपूर्ण कार्यक्रम पार पडले. ८ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता.

१६ फेब्रुवारी रोजी भाविकांना गोपाळकाला व महाप्रसादाचे वितरण करून या भक्तिमय सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी हभप गणेश बापू इंगळे, सरपंच पुंजाजी इंगळे, संतोष डुकरे, गजानन खरात, दत्ता राजेकर, संतोष परिहार, पुरुषोत्तम माळेकर, श्रीराम लहाने व संदीप इंगळे यांनी अथक परिश्रम घेऊन सोहळ्यात योगदान दिले.तसेच या ठिकाणी सेवा देणाऱ्या कीर्तनकार, प्रवचनकार तसेच भजनी मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top