Mahabreaking

[breaking_news]

  Case Filed: दैवी शक्ती’चा दावा करणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हा; बालकांवरील अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघड

Case Filed: दैवी शक्तीचा दावा करून दरबार भरवणाऱ्या निंभा येथील भोंदु बाबांवर मूर्तिजापूर पोलिसांनी 23 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या एका कथित ‘भोंदू बाबा’विरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. चेतन सुनील मुळे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे.

  Case Filed

व्हायरल व्हिडिओनंतर मूर्तिजापूर पोलिसांची कारवाई : अंधश्रद्धा विरोधी कायद्याखाली गुन्हा

 संजय तायडे

मूर्तिजापूर : दैवी शक्तीचा दावा करून दरबार भरवणाऱ्या निंभा येथील भोंदु बाबांवर मूर्तिजापूर पोलिसांनी 23 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक व्हिडिओच्या आधारे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या एका कथित ‘भोंदू बाबा’विरुद्ध मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. चेतन सुनील मुळे (वय २४) असे आरोपीचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चेतन मुळे हा मुलांच्या कपड्यांना तोंडाने पकडून त्यांना फिरवित असल्याचे दिसून आले. या प्रकारामुळे समाजात संतापाची लाट उसळली होती. विशेषतः बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर मानला गेला. याची दखल घेत बाल कल्याण समिती, अकोला येथील सदस्य प्रांजली मनोज जैस्वाल यांनी तक्रार दाखल केली.

त्यानुसार, मूर्तिजापूर ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक १८९/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १२५, बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत कलम ७५ (बालकांवरील क्रूरता) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ अंतर्गत कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अंधश्रद्धा पसरविणाऱ्या आणि बालकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रवृत्तीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास ठाणेदार श्रीधर गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखेडे, मनिषा सामटकर तसेच पोलीस कर्मचारी करत आहेत.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंधश्रद्धेविरोधात जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा प्रकारांपासून दूर राहण्याचे व संशयास्पद प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top