Buffaloes being transported : समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर टोलनाक्याजवळ म्हशींची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

मेहकर : समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर टोलनाक्याजवळ म्हशींची अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.
२३ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉर टोलनाक्याजवळ दोन आयशरमधून म्हशींची नि र्दयीपणे वाहतुक होत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. या नागरिकांनी म्हशींची वाहतूक करणारी दोन आयशर वाहने थांबवून ठेवली व मेहकर पोलिसांना घटनेची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आलेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरांजे, पोहेकॉ बेंडवाल यांच्यासह पथक तातडीने शासकीय वाहनाने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी आयशर वाहन क्रमांक MH 20 GZ-3170 व MH 20 EL-9858 उभी आढळून आली. वाहनांच्या बाजूला मोठी गर्दी जमलेली होती. उपस्थित नागरिकांनी आपली नावे विशाल संतोष लोखंडे (रा. सावत्रा), रोहन उत्तम शिंदे, अभिजीत लष्कर, सतीश गुंजकर व इतर अशी सांगितली. तपासादरम्यान आयशर वाहनांमधून म्हशींची क्षमतेपेक्षा अधिक, कोणतीही योग्य व्यवस्था न करता, दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. जनावरांना पाणी, चारा व आवश्यक काळजी न घेता जीवितास धोका निर्माण होईल अशा स्थितीत वाहतूक केल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलीसांनी काढला.
या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अतुल जानु पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहकर पोलिसांनी अफसर रशीद शेख (वय ४५, व्यवसाय चालक, रा. बालानगर, ता. पैठण, जि. संभाजीनगर), अब्दुल राजीक अब्दुल खालीद (वय ४५, रा. कामठी कोसाटाल, खानसाब का बगीचा, ता. कामठी, जि. नागपूर), अब्दुल वशी अब्दुल अलीम (वय ३७, रा. बाम्हणवाडा, जि. शिवणी, राज्य मध्यप्रदेश) व शेख वसीम अहमद (वय ४१, रा. कामठी भाजीमंडी, न्यू इयर गॅस गोदाम परिसर, ता. कामठी, जि. नागपूर) यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दोन्ही आयशर वाहने ताब्यात घेतली असून जनावरांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत. समृद्धी महामार्गावर जनावरांची बेकायदेशीर व अमानुष वाहतूक रोखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

