Mahabreaking

[breaking_news]

BJPs expansion: भाजपच्या विस्ताराला देऊळगाव राजा तालुक्यात बळ; गणेश नागरे यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ

BJPs expansion: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित राजकीय विस्तार साधता आला नसला, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात भाजपचे युवानेते गणेश नागरे यांनी पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख योजनांची माहिती सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या संपर्क मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

BJPs expansion

आमदार श्वेताताई महाले यांची गणेश नागरे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

गजानन तिडके

देऊळगाव राजा : सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला गेल्या अनेक वर्षांत अपेक्षित राजकीय विस्तार साधता आला नसला, तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटनात्मक बांधणीवर भर दिल्याचे चित्र दिसत आहे. देऊळगाव राजा तालुक्यात भाजपचे युवानेते गणेश नागरे यांनी पक्षाची विचारधारा आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख योजनांची माहिती सर्व समाजघटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू केलेल्या संपर्क मोहिमेला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

याच पार्श्वभूमीवर १० ऑगस्ट रोजी स्थानिक सुरुची हॉटेलच्या परिसरात आमदार श्वेताताई महाले आणि भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या सोहळ्यात तालुक्यातील विविध गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शेकडो युवकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा तालुक्यात भाजपच्या संघटनात्मक हालचालींना वेग आल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि युवकांना पक्षाच्या संघटनेशी जोडण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरला.

यावेळी इंजिनिअर भारतीताई इंगळे, बायगाव खुर्दच्या सरपंच प्रतीक्षाताई नागरे, गणेश हांडे, सुरा येथील सरपंच सिद्धेश्वर चेके, सावखेड नागरेचे सरपंच संजय मोरे, शिवणी आरमाळचे अनिल सोनपसारे, सावखेड भोईचे उपसरपंच वसंत वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संतोष टेकाळे, मल्हारी चवरे, प्रल्हाद ढोले, गणेश खोबरे, गंगाधर इंगळे, रमेश चेके, सुभाष डोंगरे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याशिवाय ग्रामीण भागातील अनेक युवकांनीही पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले.

कार्यक्रमाला चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष संतोष काळे, माजी खासदार सुखदेव काळे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य भगवान मुंढे, जिल्हा सरचिटणीस राम मुंढे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, ज्येष्ठ नेते सुभाषराव घिके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सविताताई पाटील, देऊळगाव राजा नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष वनिताताई भुतडा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेश नागरे यांच्या संघटनात्मक प्रयत्नांचे कौतुक

तालुक्यात भाजपची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी गणेश नागरे यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांचे आमदार श्वेताताई महाले यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील युवक आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या विचारधारेसोबत जोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना पक्ष नेतृत्वाकडून पाठबळ मिळत असल्याचे यावेळी दिसून आले.

दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यात पक्षाला मिळत असलेला प्रतिसाद हा भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवरील जनतेच्या विश्वासाचे द्योतक असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, त्याचा राजकीय फायदा आगामी निवडणुकांत कितपत होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top