Mahabreaking

[breaking_news]

Big relief for teacher:  शिक्षक मतदारांसाठी मोठा दिलासा! खासगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आता चार तासांची सवलत

Big relief for teacher: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली होती. मात्र, मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ लक्षात घेता ही सवलत आता चार तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात कार्यरत शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Amravati

  शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ ऑक्टोबरला मतमोजणी

अकोला  : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना मतदानासाठी यापूर्वी दोन तासांची विशेष सवलत देण्यात आली होती. मात्र, मतदान केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा प्रवासाचा वेळ लक्षात घेता ही सवलत आता चार तासांपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे खासगी क्षेत्रात कार्यरत शिक्षक मतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

खासगी कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी चार तासांची सवलत

शिक्षक मतदारसंघात मतदार म्हणून नोंद असलेल्या शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजेची तरतूद आहे. मात्र, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या मतदारांना ही रजा लागू होत नसल्याने त्यांना मतदानासाठी वेळ मिळावा, यासाठी यापूर्वी दोन तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश देण्यात आले होते.

दरम्यान, काही मतदान केंद्रे दूर अंतरावर असल्याने प्रवासासाठी अधिक वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांनी सुधारित पत्राद्वारे खासगी आस्थापनांमधील शिक्षक मतदारांना दोन तासांऐवजी चार तासांची विशेष सवलत देण्याबाबत कळविले आहे. त्यानुसार अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील संबंधित खासगी आस्थापनांनी या निर्देशांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी दिले आहेत.

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुका घेण्यात येत आहेत. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-ब तसेच राज्य शासनाच्या संबंधित निर्णयानुसार पात्र मतदारांना मतदानासाठी आवश्यक सवलती देण्याची तरतूद आहे.

निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक पात्र मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, खासगी आस्थापनांनी संबंधित कर्मचाऱ्यांना मतदानासाठी चार तासांची विशेष सवलत उपलब्ध करून द्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अमरावती विभागातील शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाच्या हक्काचा प्राधान्याने वापर करावा, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक शिक्षकांचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या प्रश्नांना विधिमंडळात आवाज मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मतदानासाठी उपलब्ध करून दिलेल्या सवलतीचा लाभ घेत शिक्षक मतदार किती मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top