Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Bhagwan Mahavir :डोणगाव येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव उत्साहात  

Bhagwan Mahavir :श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र, डोणगाव येथे सर्व श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत वर्तमान जैन शासन नायक भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव दिनांक २८ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

Bhagwan Mahavir

डोणगाव : श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर अतिशय क्षेत्र, डोणगाव येथे सर्व श्रावक-श्राविकांच्या उपस्थितीत वर्तमान जैन शासन नायक भगवान महावीर जन्मकल्याणक महामहोत्सव दिनांक २८ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

या महोत्सवाची सुरुवात २८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता प्रभातफेरीने झाली. त्यानंतर अभिषेक करण्यात आला. दुपारी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर सांस्कृतिक भवनामध्ये महिला तसेच बालक-बालिकांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये ‘विद्याधर से विद्यासागर’, विविध वेशभूषा स्पर्धा आणि अन्य कार्यक्रम उत्साहात घेण्यात आले.

२९ मार्च रोजी सकाळी ६ वाजता भोला सागर परिसरात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर अभिषेक, दीपप्रज्वलन आणि कल्याण मंदिर विधान पार पडले. दुपारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये जैन धर्मातील विविध परंपरांवर आधारित नाटके, गीते, नाटिका, नृत्य तसेच जैन इतिहासावर आधारित सादरीकरण करण्यात आले. तीर्थंकर मातेची सोळा स्वप्ने हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला.

३० मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता नगर प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर वर्धमान विधान, महावीरांचा पाळणा आणि जन्मकल्याणक सोहळा पार पडला. सायंकाळी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध मनोवेधक नृत्य व नाटिका सादर करण्यात आल्या.

३१ मार्च २०२६ रोजी सकाळी अभिषेक, नित्यपूजा आणि भक्तामर विधान पार पडले. त्यानंतर श्रीजींची मिरवणूक प्रभातफेरी मार्गे काढण्यात आली. दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दानशूर धर्मप्रेमी प्रवीण सुभाष धोंगडे आणि सचिन सुभाष धोंगडे यांनी अत्यंत विनम्रतेने या महाप्रसादाचे आयोजन केले.

यावेळी घोडागाडीच्या बग्गीतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. भगवान महावीरांची पालखीही मोठ्या उत्साहात नगरातून फिरविण्यात आली. जैन तसेच अजैन समाजातील नागरिकांनीही या शोभायात्रेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शोभायात्रेनंतर पुन्हा मंदिरात येऊन अभिषेक, पाळणा आणि महावीर जन्मकल्याणक सोहळा साजरा करण्यात आला. भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, सत्य आणि संयमाचा संदेश या सर्व कार्यक्रमांच्या केंद्रस्थानी होता. त्यानंतर आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

डोणगावकरांनी अत्यंत उत्साहात महावीर जयंतीची ही भव्य मिरवणूक अनुभवली. शोभायात्रेदरम्यान विविध ठिकाणी शरबत, शीतपेये, कुल्फी आदींची व्यवस्था करण्यात आली होती. विशेषतः महिलांनी परिधान केलेले आकर्षक व शिस्तबद्ध पोशाख तसेच त्यांनी सादर केलेले मनोवेधक नृत्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top