Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Bear Sighted :साखरखेर्डा परिसरात अस्वलाचा वावर; शेतकरी दहशतीत, कारवाईची मागणी

Bear Sighted :साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा मुक्त संचार सुरू असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच जंगली प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अस्वलाच्या उपस्थितीने नव्या संकटाचे सावट उभे ठाकले आहे.

Bear Sighted

जंगली प्राण्यांचा कहर वाढला; अस्वलाच्या मुक्त संचारामुळे शेती धोक्यात

साखरखेर्डा : साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा मुक्त संचार सुरू असून शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच जंगली प्राण्यांच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता अस्वलाच्या उपस्थितीने नव्या संकटाचे सावट उभे ठाकले आहे.

सहकार चळवळीतील ज्येष्ठ नेते लालाराव देशमुख यांचे निधन; पोफळ शिवनीत शोककळा

साखरखेर्डा गावापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोराडी जलाशयासह परिसरातील पिंपळगाव सोनारा, शिंदी, राताळी, मोहाडी, सवडद, गुंज, वरोडी, सावंगी भगत, सावंगी माळी आणि दरेगाव या भागात विविध तलाव असल्याने जंगली प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रानडुक्कर, नीलगाय (रोही) आणि हरणांच्या सततच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस शेतात पहारा द्यावा लागत आहे.

या प्राण्यांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांची शिकार करण्यासाठी बिबट्याचा वावरही वाढला असून मोहाडी शिवारात बिबट्याचे दर्शन वारंवार होत आहे. त्यातच दोन पिल्लांसह बिबट्याची उपस्थिती असल्याने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून साखरखेर्डा, सावंगी भगत आणि गोरेगाव शिवारात अस्वलाचा वावर दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते सुधीर अप्पा बेंदाडे यांच्या सावंगी भगत येथील शेतातही अस्वलाचे वास्तव्य आढळून आले आहे. त्यामुळे महिला मजूर शेतात काम करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

या संदर्भात वनविभागाशी संपर्क साधूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत सुधीर अप्पा बेंदाडे यांनी मनोज कायंदे यांच्याकडे तक्रार केली असून, हा प्रश्न विधानसभेत उपस्थित करून प्रशासनाला जागे करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top